epfo how to check pf balance through missed call
फक्त एक मिस कॉल! PF बॅलन्स जाणून घेण्यासाठी सोपा आणि सुपरफास्ट मार्ग! By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 2:09 PM1 / 8नवी दिल्ली : तुमच्या पगारातून काही हिस्सा भविष्य निर्वाह निधीअंतर्गत कपात केला जातो, याचा फायदा निवृत्तीनंतर मिळतो. निवृत्तीनंतर आयुष्याचा आनंद घेण्यासाठी भविष्य निर्वाह निधी उपयोगी पडू शकतो. 2 / 8कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या सदस्यांच्या सुविधेसाठी सतत नवीन पाऊले उचलत आहे. ईपीएफओच्या जास्तकरून सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत. यामुळे आता सदस्यांना आपल्या पीएफ खात्यासंबंधीत कामांसाठी कुठे जाण्याची गरज नाही. 3 / 8पीएफ खात्यातील बॅलन्स चेक करणे एक महत्त्वाचे काम आहे. सुरुवातीला पीएफ खात्यात किती पैसे जमा आहेत, हे जाणून घेण्यासाठी ऑफिसमध्ये जावे लागत होते. मात्र, आता खातेधारकांना कुठे जाण्याची गरज नाही. ते सहजरित्या घर बसल्या अनेक पद्धतीने आपला पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकतात. पीएफ बॅलन्स जाणून घेण्यासाठी, सर्वात सोपी पद्धत म्हणजे मिस्ड कॉल आणि एसएमएस आहे. 4 / 8पीएफ खात्यात पैसे जमा होत आहेत की नाहीत, हे तुम्ही त्वरीत मिस्ड कॉलद्वारे जाणून घेऊ शकता. मात्र, या सेवेचा लाभ घेण्यासाठी दोन अटी लागू करण्यात आल्या आहेत. ईपीएफओ पोर्टलवर यूएएनसह मोबाईल नंबर अॅक्टिव्हेट असला पाहिजेत. 5 / 8यासोबत यूएएनच्या बँक अकाउंट नंबर, आधार किंवा पॅन नंबरमधील कोणत्याही एकाला केव्हायसी असणे आवश्यक आहे. यानंतर यूएएन पोर्टलवर रजिस्टर्ड सदस्य मिस्ड कॉल देऊन आपला बॅलन्स चेक करू शकतात. 6 / 8बॅलन्स जाणून घेण्यासाठी आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर मिस्ड कॉल द्या. हा कॉल दोन रिंग वाजल्यानंतर कट होईल. यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत. मिस्ड कॉल केल्यानंतर काही वेळात तुमच्या मोबाईलवर ईपीएफओ एसएमएस पाठवेल, ज्यामध्ये तुमच्या पीएफ खात्यातील बॅलन्ससंबंधी माहिती असेल. 7 / 8तुम्ही मोबाइल एसएमएसद्वारे पीएफ खात्यातील बॅलन्स चेक करू शकता. यासाठी तुमचा यूएएन नंबर ईपीएफओसोबत रजिस्टर्ड असला पाहिजे. तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून EPFOHO UAN लिहून 7738299899 वर एसएमएस करावा लागेल. 8 / 8याचबरोबर, बॅलन्स संबंधित माहिती, तुम्हाला ज्या भाषेत हवी आहे, तो ऑप्शन निवडावा लागेल. जसे की, हिंदीसाठी EPFOHO UAN HIN लिहून मेसेज करावा लागेल. असे केल्यानंतर तुम्हाला हिंदी भाषेत ईपीएफओ एसएमएस पाठवेल. आणखी वाचा Subscribe to Notifications