शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

EPFO ची खास योजना; देशभरातील 73 लाख पेन्शनधारकांना मिळणार आनंदाची बातमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 3:26 PM

1 / 7
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या 29 आणि 30 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत केंद्रीय पेन्शन वितरण प्रणाली लागू करण्याच्या प्रस्तावावर विचार केल्यानंतर त्याला मंजुरी देण्याची शक्यता आहे.
2 / 7
ही प्रणाली लागू झाल्यानंतर देशभरातील 73 पेन्शनधारकांच्या खात्यावर निवृत्तीवेतन एकाच वेळी ट्रान्सफर केले जाऊ शकते. सध्या EPFO ​​ची 138 प्रादेशिक कार्यालये आपल्या क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या खात्यात पेन्शन ट्रान्सफर करतात.
3 / 7
अशा परिस्थितीत पेन्शनधारकांना वेगवेगळ्या दिवशी आणि वेळेला पेन्शन मिळते. 29 आणि 30 जुलै रोजी होणार्‍या EPFO ​​ची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टच्या (CBT) बैठकीत केंद्रीय पेन्शन वितरण प्रणालीच्या निर्मितीचा प्रस्ताव मांडला जाईल, असे एका सूत्राने सांगितले.
4 / 7
सूत्राने सांगितले की, ही प्रणाली लागू केल्यानंतर 138 क्षेत्रीय कार्यालयांच्या डेटाबेसच्या आधारे पेन्शनचे वितरण केले जाईल. यामुळे 73 लाख पेन्शनधारकांना एकाच वेळी पेन्शन दिली जाणार आहे.
5 / 7
सर्व क्षेत्रीय कार्यालये त्यांच्या क्षेत्रातील पेन्शनधारकांच्या गरजा वेगळ्या पद्धतीने हाताळतात. यामुळे पेन्शनधारक वेगवेगळ्या दिवशी पेन्शन देऊ शकतात, असे सूत्राकडून सांगितले आहे.
6 / 7
20 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या CBT च्या 229 व्या बैठकीत, C-DAC द्वारे केंद्रीकृत IT आधारित प्रणाली विकसित करण्याच्या प्रस्तावाला विश्वस्तांनी मान्यता दिली होती.
7 / 7
कामगार मंत्रालयाने बैठकीनंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यानंतर प्रादेशिक कार्यालयांचे तपशील टप्प्याटप्प्याने केंद्रीय डेटाबेसकडे हस्तांतरित केले जातील. यामुळे सेवांचे संचालन आणि पुरवठा सुलभ होईल.
टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीEmployeeकर्मचारी