EPFO: PF interest rates not credited to your pf account yet then complain here
EPFO : तुमच्या 'PF'वरील व्याजाचे पैसे अजून जमा झाले नाहीत? मग, याठिकाणी करा तक्रार.... By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 12:20 PM1 / 10नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) 6.5 कोटी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने पीएफवरील (PF)व्याजाचे पैसे ट्रान्सफर करण्यास सुरुवात झाली आहे. तुमच्या पीएफ खात्यातील बॅलन्स तपासून तुम्ही हे पाहू शकता की तुम्हाला पीएफवर व्याजाचे हक्काचे पैसे मिळाले आहेत की नाही. 2 / 10तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. सरकार आर्थिक वर्ष 2020-21 साठी पीएफवर 8.5 टक्के व्याज दराने (PF Interest Rate) पैसे ट्रान्सफर करत आहे. दरम्यान, तुमच्या पीएफ खात्यात अद्याप पीएफवरील व्याजाचे पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही याबाबत तक्रार दाखल करू शकता.3 / 10तक्रार करण्यासाठी तुम्हाला https://epfigms.gov.in/ या वेबसाइटवर जावे लागेल. या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला Register Grievance वर क्लिक करावे लागेल. यानंतर पीएफ मेंबर, ईपीएफ पेन्शनर, अदर्सपैकी तुमचे स्टेटस निवडा. 4 / 10यानंतर पीएफ खात्याशी संबंधित तक्रार करण्यासाठी पेएफ मेंबर निवडा. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, UAN क्रमांक आणि सुरक्षा कोड प्रविष्ट करा आणि Get Details वर क्लिक करा. UAN शी जोडलेल्या खात्यातून वैयक्तिक माहिती उघड होईल.5 / 10 त्यानंतर Get OTP वर क्लिक करा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. तुम्ही OTP सबमिट करताच, वैयक्तिक तपशील भरल्यानंतर, ज्या पीएफ क्रमांकाशी संबंधित तक्रार नोंदवायची आहे त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक पॉप अप येईल. 6 / 10येथे तुम्हाला पीएफ ऑफिसर, एम्प्लॉयर, एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम किंवा एक्स-पेन्शन या पर्यायातून एक पर्याय निवडावा लागेल. तपशील आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट वर क्लिक करा. यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ईमेलवर तक्रार नोंदणी क्रमांक येईल.7 / 10UAN पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस कॉल देऊन त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेता येईल. तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफचा तपशील तुम्हाला ईपीएफओच्या मेसेजद्वारे प्राप्त होईल. 8 / 10दोन रिंगनंतर हा कॉल स्वयंचलितपणे डिस्कनेक्ट होईल. या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. ईपीएफओ UAN सेवा प्रदान करते, ज्याद्वारे खातेदार त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक पाहू शकता.9 / 10SMS च्या माध्यमातून तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल. ‘EPFOHO UAN ENG’ असे लिहून तुम्हाला हा मेसेज करावा लागेल. ENG म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. 10 / 10 मात्र, तुम्हाला अन्य कोणत्या भाषेत माहिती हवी असेल तर ENG ऐवजी तुम्हाला हव्या असलेल्या भाषेची पहिली तीन अक्षरं तुम्हाला टाकावी लागतील. हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मलयाळम आणि बंगाली भाषेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या क्रमांकावर मेसेज करण्यासाठी ईपीएफओमध्ये तुमचा नंबर रजिस्टर्ड असणे अनिवार्य आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications