epfo ppos and uan cards is now available on digilocker aadhar pan documents rkp
EPFOची नवीन सुविधा, करोडो खातेधारकांना होणार फायदा! By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 5:34 PM1 / 11प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी त्याच्या प्रॉव्हिडेंट फंडातील (पीएफ) निधी महत्त्वाचा असतो. 2 / 11या निधीमुळे लोक आपले भविष्य सुरक्षित करू शकतात. पीएफच्या माहितीसाठी UAN नंबर जास्त गरजेचा असतो. 3 / 11UAN नंबरच्या माध्यमातून प्रॉव्हिडेंट फंड अकाउंटची माहिती समजते. 4 / 11याच प्रकारे रिटायरमेंटवेळी पेन्शन पेमेंट ऑर्डरची (PPO) गरज असते. यासाठी 12 अंकांचा एक नंबर असतो. 5 / 11आता ईपीएफओने एक खास सुविधा सुरु केली आहे. या नवीन सुविधेच्या माध्यमातून तुम्ही सरकारच्या ई-लॉकर सर्व्हिस DigiLocker पासून आपला UAN/PPO नंबर काढू शकता.6 / 11ईपीएफओच्या या सुविधेचा फायदा देशातील करोडो पीएफ खातेधारकांना मिळणार आहे. डिजिलॉकरची वेबसाइट https://digilocker.gov.in/ वरून तुम्ही UAN/PPO नंबर काढू शकता.7 / 11यासाठी आपल्याजवळ आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार नंबरच्या आधारे तुम्ही आपला डिजिटल लॉकर उघडू शकता. 8 / 11दरम्यान, यासाठी आपल्याला स्वत:चे अकाउंट तयार करावे लागेल. 9 / 11पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल इंडिया प्रोग्रॉमच्या माध्यमातून डिजिटल लॉकरची सुरुवात केली होती.10 / 11इंटरनेटच्या आधारे या सेवेच्या माध्यमातून जन्म दाखला, पासपोर्ट, शैक्षणिक प्रमाण पत्र यासारखी महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाइन ठेवू शकता.11 / 11यासाठी आपल्याजवळ आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार नंबरच्या आधारे तुम्ही आपला डिजिटल लॉकर उघडू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications