शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

EPS Rule : १० वर्षांच्या नोकरीनंतर सर्वांना पेन्शनची खात्री, पूर्ण करावी लागणार ही अट; पाहा काय आहे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 9:41 AM

1 / 8
तुम्ही 10 वर्षे खाजगी क्षेत्रात नोकरी केली तरी तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. EPFO च्या नियमांनुसार, कोणत्याही कर्मचाऱ्याला 10 वर्षांच्या सेवेनंतर पेन्शनचा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकच अट आहे, ती कर्मचाऱ्याने पूर्ण करणे आवश्यक आहे.
2 / 8
खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या पगारातील मोठा हिस्सा पीएफ म्हणून कापला जातो. जो दरमहा कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात जमा होतो. नियमांनुसार, कर्मचार्‍यांच्या मूळ पगाराचा + डीएचा 12 टक्के हिस्सा दरमहा पीएफ खात्यात जमा केला जातो. त्यापैकी कर्मचार्‍यांचा संपूर्ण हिस्सा EPF मध्ये जातो, तर कंपनीचा 8.33% हिस्सा कर्मचारी पेन्शन योजना (EPS) मध्ये जातो आणि 3.67% दरमहा EPF योगदानामध्ये जातो.
3 / 8
EPFO च्या नियमांनुसार, 10 वर्षे सतत काम केल्यानंतर, कर्मचाऱ्याला पेन्शनचा लाभ घेता येतो. यामध्ये एकच अट आहे की नोकरीचा कालावधी 10 वर्षांचा असावा. 9 वर्षे 6 महिने सेवा देखील 10 वर्षे म्हणून गणली जाते. परंतु जर नोकरीचा कालावधी साडेनऊ वर्षांपेक्षा कमी असेल तर तो कालावधी केवळ 9 वर्षे गणला जाईल. अशा परिस्थितीत, कर्मचारी निवृत्तीचे वय पूर्ण होण्यापूर्वीच पेन्शन खात्यात जमा केलेली रक्कम काढू शकतो. कारण त्यांना पेन्शन मिळू शकत नाही.
4 / 8
जर कर्मचाऱ्याने दोन वेगवेगळ्या संस्थांमध्ये 5-5 वर्षे काम केले असेल तर काय? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. तसंच दोन नोकऱ्यांमध्ये दोन वर्षांचे अंतर असेल तर त्या कर्मचाऱ्याला पेन्शन मिळू शकेल का? असाही प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. अनेक जण त्यांच्या जबाबदाऱ्यांमुळे मध्येच नोकरीतून ब्रेक घेतात आणि काही वर्षांनी पुन्हा नोकरी सुरू करतात. अशा परिस्थितीत त्यांचा 10 वर्षांचा कार्यकाळ कसा पूर्ण होणार आणि त्यांना पेन्शन योजनेचा लाभ कसा मिळणार? जाणून घेऊया काय आहेत नियम?
5 / 8
ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, नोकरीतील अंतर कितीही असले तरी, सर्व नोकऱ्या जोडून 10 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला जाऊ शकतो. मात्र अट अशी आहे की, प्रत्येक कामात कर्मचाऱ्याने आपला UAN क्रमांक बदलू नये, जुना UAN क्रमांक चालू ठेवावा लागेल. म्हणजेच, एकाच UAN वर एकूण 10 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला पाहिजे.
6 / 8
नोकरी बदलल्यानंतरही UAN तसाच राहिला आणि PF खात्यात जमा केलेले संपूर्ण पैसे त्याच UAN मध्ये दिसतील. दोन नोकऱ्यांमध्ये काही काळ अंतर असल्यास ते काढून टाकून कार्यकाळ एक मानला जातो. म्हणजेच, पूर्वीची नोकरी आणि नवीन नोकरी यातील अंतर काढून टाकले जाते आणि ते नवीन नोकरीमध्ये जोडले जाते.
7 / 8
उदाहरणद्वारे समजून घ्यायचं झालं तर तुम्ही गेल्या पाच वर्षांपासून एका कंपनीत काम करत आहात. पहिली नोकरी सुटल्यानंतर किंवा काही कारणास्तव दोन वर्षे घरी राहिला असाल. त्यानंतर नवी नोकरी मिळाली तरी तुम्हाला तुमचा जुना युएएन कायम ठेवावा लागेल.
8 / 8
यानंतर तुम्ही तुमच्या पहिल्या आणि दुसऱ्या नोकरीदरम्यान गॅप असली तरी पेन्शनचा लाभ घेऊ शकता. पहिल्या कंपनीत जर तुम्ही पाच वर्षे काम केले असेल आणि दुसऱ्या कंपनीत सहा वर्षे झाली असतील, तर त्याच्या मधील कालावधी काढून टाकला जाईल आणि तो 11 वर्षांचा कालावधी धरला जाईल. अशा प्रकारे तुम्ही रिटायरमेंट नंतर पेन्शनचा लाभ घेण्यास पात्र ठराल.
टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीPensionनिवृत्ती वेतनjobनोकरी