EPFO rules these mistakes make your epf account inoperative how to get it operative
अलर्ट! 'या' चुका केल्यास तुमचे पीएफ खाते होईल बंद; जाणून घ्या EPFOचे महत्त्वाचे नियम By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 1:39 PM1 / 10नोकरदार लोकांसाठी, भविष्य निर्वाह निधीची रक्कम (Provident Fund) ही त्यांची आयुष्यभराची कमाई असते. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी ईपीएफओशी (EPFO) संबंधित नियमांची माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. जोपर्यंत तुम्ही नोकरी करता, तोपर्यंत तुम्ही EPF मध्ये योगदान देता. 2 / 10तुम्ही निवृत्त झाल्यावर तुमच्याकडे भरीव रक्कम असते. जेणेकरून या पैशाच्या जोरावर तुम्ही तुमचे वृद्धापकाळ घालवू शकता. परंतु अनेक वेळा असे घडते की, माहितीच्या अभावामुळे किंवा काही चुकांमुळे पीएफ खाते बंद होते. त्यामुळे तुम्ही अशी कोणतीही चूक करू नये, हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.3 / 10जर तुम्ही ज्या कंपनीत पूर्वी काम करत होता, त्या कंपनीने तुमचे पीएफ खाते नवीन कंपनीकडे ट्रान्सफर केले नसेल आणि जुनी कंपनी बंद झाली असेल. अशा परिस्थितीत, जर तुमच्या पीएफ खात्यातून 36 महिन्यांपर्यंत कोणताही व्यवहार झाला नाही, म्हणजेच त्यात पैसे टाकले गेले नाहीत. तर तुमचे पीएफ खाते बंद होऊ शकते. ईपीएफओ अशा खात्यांना 'इनऑपरेटिव्ह' कॅटगरीत ठेवते.4 / 10एकदा खाते 'इनऑपरेटिव्ह' (inoperative) झाले की तुम्ही व्यवहार करू शकणार नाही, खाते पुन्हा अॅक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला ईपीएफओकडे जाऊन अर्ज करावा लागेल. 'इनऑपरेटिव्ह' झाल्यानंतरही खात्यात पडलेल्या पैशावर व्याज जमा होत राहते, म्हणजे तुमचे पैसे बुडलेले नाहीत, ते तुम्हाला परत मिळतात. यापूर्वी या खात्यांवर व्याज मिळत नव्हते. परंतु, 2016 मध्ये नियमात सुधारणा करून व्याज सुरू करण्यात आले. तसेच, तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की, तुम्ही वयाची 58 वर्षे पूर्ण करेपर्यंत तुमच्या पीएफ खात्यावर व्याज जमा होते.5 / 10नवीन नियमांनुसार, जर कर्मचाऱ्याने ईपीएफ बॅलन्स काढण्यासाठी अर्ज केला नसेल तर ईपीएफ खाते 'इनऑपरेटिव्ह' होईल. यामध्ये a)सेवानिवृत्तीच्या 36 महिन्यांनंतरही जेव्हा सदस्य 55 वर्षांचा होतो. b) जेव्हा सदस्य कायमस्वरूपी परदेशात स्थायिक झाला. c) सदस्याचा मृत्यू झाला असल्यास. D) जर सदस्याने संपूर्ण निवृत्ती निधी काढला असेल, तर खाते 'इनऑपरेटिव्ह' होईल. 6 / 10याचबरोबर, 7 वर्षांपर्यंत कोणीही पीएफ खात्यावर क्लेम केला नाही तर, हा निधी ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीमध्ये (Senior Citizens’ Welfare Fund) टाकला जातो.7 / 10ईपीएफओने आपल्या एका परिपत्रकात म्हटले आहे की, निष्क्रिय खात्यांशी संबंधित दावे निकाली काढण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. फसवणुकीशी संबंधित जोखीम कमी होईल आणि योग्य दावेदारांना हक्काची रक्कम दिली जाईल याची काळजी घेतली पाहिजे.8 / 10निष्क्रिय पीएफ खात्यांशी संबंधित दावा निकाली काढण्यासाठी, कर्मचाऱ्याच्या नियोक्त्याने (Employer) तो दावा प्रमाणित करणे आवश्यक आहे. मात्र, ज्या कर्मचार्यांची कंपनी बंद आहे आणि दावा प्रमाणित करण्यासाठी कोणीही नसेल, तर बँक KYC कागदपत्रांच्या आधारे असा दावा प्रमाणित करेल.9 / 10केवायसी कागदपत्रांमध्ये पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, रेशन कार्ड, ईएसआय आयडी कार्ड, ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स यांचा समावेश आहे. याशिवाय, आधार कार्डासारखे सरकारकडून जारी केलेले इतर कोणतेही ओळखपत्रही यासाठी वापरले जाऊ शकते. यानंतर, सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त किंवा इतर अधिकारी रकमेनुसार खात्यातून पैसे काढणे किंवा खाते हस्तांतरणास मान्यता देऊ शकतील.10 / 10जर रक्कम 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्तांच्या मान्यतेनंतर पैसे काढले किंवा हस्तांतरित केले जातील. तसेच रक्कम 25 हजार रुपयांपेक्षा जास्त आणि 50 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास खाते अधिकारी निधी हस्तांतरण किंवा काढण्यास मान्यता देऊ शकतील. जर रक्कम 25 हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर डीलिंग असिस्टंटला ती मंजूर करता येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications