EPFO: These are the five benefits that PF account holders get on their account
EPFO: पीएफ खातेदारांना खात्यावर मिळतात या पाच सुविधा, असा घेता येईल लाभ By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 8:59 AM1 / 7कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO) सर्व कर्मचाऱ्यांना पीएफची सुविधा देते. यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारामधून ठरावीक रक्कम पीएफ खात्यात जमा करण्यासाठी कापली जाते. 2 / 7पीएफच्या माध्यमातून बचत झालेली रक्कम कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर फायदेशीर ठरते. मात्र केवळ निवृत्तीनंतरच नाही तर पीएफ खातेधारकांना या खात्याच्या माध्यमातून अनेक लाभ मिळतात. जाणून घेऊया त्या लाभांविषयी...3 / 7कुठल्याही कर्मचाऱ्याचे पीएफ अकाऊंट उघडले की, त्याचा आपोआप विमा उतरवला जातो. एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इंश्योरन्स (ई़डीएलआय)च्या अंतर्गत कर्मचाऱ्याचा ७ लाखांपर्यंतचा विमा उतरवला जातो. ईपीएफओच्या सक्रीय सदस्यांच्या सेवेच्या अवधीदरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या नामित आणि कायदेशीर वारसांना ७ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळते. ही मदत कंपन्या आणि केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देतात. हल्लीच यामधील मदतीची रक्कम ६ लाखांवरून वाढवून सात लाख रुपये करण्यात आली आहे. 4 / 7तुम्हाला करामध्ये सवलत हवी असेल तर पीएफ हा सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र नव्या टॅक्स सिस्टिममध्ये अशी सुविधा नाही आहे तर जुन्या टॅक्स सिस्टिममध्ये ही सुविधा आहे हे तुम्हाला ठावूक असले पाहिजे. ईपीएफ खातेधारक प्राप्तिकर कलम ८०सी नुसार त्यांच्या पगारावर लागू होणाऱ्या करामध्ये १२ टक्क्यांपर्यंतची बचत करू शकतात. 5 / 7पीएफ अकाऊंटमध्ये जमा रकमेमधून ८.३३ टक्के रक्कम कर्मचारी पेन्शन स्कीममध्ये वर्ग केली जाते. ही रक्कम निवृत्तीनंतर निवृत्तीवेतनाच्या रूपात मिळते. निवृत्तीवेतन हा व्यक्तीचा वृद्धापकाळातील मोठा आधार असते. त्यासाठी सरकार विविध योजनाही चालवत असते. 6 / 7कर्मचाऱ्यांच्या निष्क्रिय पीएफ खात्यांवरही व्याज दिले जाते. २०१६मध्ये कायद्यात करण्यात आलेल्या बदलांनुसार आता पीएफ खातेदारांना त्यांच्या तीन वर्षांहून अधिक काळ निष्क्रिय असलेल्या पीएफ खात्यांवर जमा रकमेवरसुद्धा व्याज दिले जाते. यापूर्वी तीन वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या पीएफ खात्यांवर व्याज देण्याची तरतूद नव्हती. 7 / 7पीएफ फंड ही एक उत्तम सुविधा आहे. यामधून तुम्ही गरजेच्या वेळी ठरावीक पैसे काढू शकता. त्यामुळे तुमच्यावर कर्ज घेण्याची वेळ येत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications