Equitas small finance bank offers women savings account with 7 percent interest rate
बचत खात्यावर 'विशेष' लोकांना 7 टक्के व्याज, 'ही' बँक मोफत देतेय भरगोस ऑफर्स! By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 17, 2020 5:39 PM1 / 10सध्या अधिकांश बँका बचत खात्याचे व्याज दर कमी करत आहेत. मात्र, इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने (ईएसएफबी) एका विशिष्ट वर्गासाठी मोठी ऑफर लॉन्च केली आहे. या ऑफरमध्ये केवळ बचत खात्याचा व्याजदरच अधिक नाही, तर इतर अनेक प्रकारच्या सुविधाही देण्यात आल्या आहेत.2 / 107 टक्के व्याजदर - इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने (ईएसएफबी) 7 टक्के व्याजदरासह महिलांसाठी 'ईवा' बचत खाते सुरू करण्याची घोषणा केली आहे. अर्थात, या बँकेच्या बचत खात्यात पैसे ठेवल्यास 7 टक्के व्याज मिळेल. मात्र, ही ऑपर केवळ महिला वर्गासाठीच आहे. 3 / 10काय म्हणते बँक - बँकेने म्हटले आहे, ईवा हे एक अद्वितीय बचत खाते आहे. हे आरोग्य, धन आणि समृद्धी सारख्या पैलूंवर भारतीय महिलांच्या हिताचा प्रयत्न करते.4 / 10मिळणार अशा सुविधा - बचत खाते असलेल्या महिला ग्राहकांसाठी बँक, डॉक्टर, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञांसह मोफत आरोग्य तपासणी, तसेच अनलिमिटेल टेली काउंसिलिंगदेखील उपलब्ध करून देईल.5 / 10गोल्ड लोनमध्येही सूट - या शिवाय ही बँक पीएफ सूट आणि महिला ग्राहकांसाठी गोल्ड लोनच्या दरातही सूट देईल. 6 / 10या बँकेने महिला क्रिकेटर स्मृती मंधाना हिची नवी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणूनही घोषणा केली आहे.7 / 10आरबीआयने घातले होते निर्बंध - याच महिन्याच्या सुरुवातीला भारतीय रिझर्व्ह बँकेने इक्विटास स्मॉल फायनांस बँकेवर लावण्यात आलेले सर्व निर्बंध हटवले. यात नवीन शाखा सुरू करण्यावरही निर्बंध घालण्यात आले होते. 8 / 10आता इक्विटास स्मॉल फायनान्स बँक नवी शाखाही सुरू करू शकते. 9 / 10निर्बंध हटवल्यानंतर बँकेला आपला व्यवसाय वाढवण्यासाठीही मदत मिळेल. 10 / 10इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेच्या कामकाजाला सप्टेंबर 2016मध्ये सुरुवात झाली होती. तसेच, याचवर्षी म्हणजे 2020मध्ये ही बँक सूचीबद्ध झाली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications