शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

nVidia : कंपनी असावी तर अशी! 'या' कंपनीतील शिपाईदेखील भरतात लाखोंचा टॅक्स, सॅलरी पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2023 4:05 PM

1 / 7
जगातील अनेक मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना खूप चांगला पगार देतात. या कंपन्यांमध्ये काम करण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण आज आम्ही तुम्हाला अशा कंपनीबद्दल सांगणार आहोत, जिच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा पगार कोट्यवधींमध्ये आहे.
2 / 7
कर्मचाऱ्यांचं सोडा, या कंपनीत काम करणारे शिपाई आहेत त्यांनादेखील बंपर पगार मिळतो. या कंपनीचे शिपाईही लाखो रुपयांचा कर भरतात. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्या पगाराचा अंदाज लावू शकता.
3 / 7
या कंपनीत काम करणारे सर्वजण श्रीमंत आहेत. ही अशी कंपनी आहे जिथे नोकरी मिळणे म्हणजे तुम्ही श्रीमंत होणं हे निश्चित आहे. येथे कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त इतरही अनेक सुविधा मिळतात.
4 / 7
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्मचाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा पगार देणारी ही कंपनी अमेरिकेतील आहे. अमेरिकेची मल्टीनॅशनल कंपनी एनविडीया (NVIDIA) आपल्या कर्मचाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा पगार देत आहे.
5 / 7
कर्मचाऱ्यांना पगार देण्याच्या बाबतीत ही कंपनी (NVIDIA) पहिल्या क्रमांकावर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर आपण या कंपनीतील कर्मचार्‍यांच्या सरासरी पगाराबद्दल बोललो तर ते वार्षिक सुमारे १.७० लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे १.४० कोटी रुपये आहे.
6 / 7
एनविडीया (NVIDIA) ही एक मल्टीनॅशनल कंपनी आहे. ही कंपनी अमेरिकेतील मध्ये स्थित आहे. या कंपनीची स्थापना १९९३ मध्ये झाली. कंपनी ऑटोमोटिव्ह आणि मोबाइल कॉम्प्युटिंग मार्केटमध्ये वापरल्या जाणार्‍या विशेष चिपची निर्मिती करते.
7 / 7
कंपनी गेमिंग उद्योग आणि व्यावसायिक बाजारपेठेसाठी ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स तयार करते. सध्या ही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात काम करत आहे. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना बंपर पगार देत आहे. जगातील सर्वाधिक पैसे देणाऱ्या कंपनीच्या यादीत या कंपनीला पहिलं स्थान मिळालं आहे.
टॅग्स :MONEYपैसाTaxकरjobनोकरी