Evergrande crisis: एव्हरग्रँड संकट! हाहाकार, जगातील अब्जाधीशांचे एकाच दिवसात 10 लाख कोटी बुडाले By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 9:06 AM
1 / 11 भारतात सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण पहायला मिळाली. ही घसरण सेन्सेक्स किंवा निफ्टीपर्यंतच राहिली नाही तर अमेरिकेच्या डाऊ जोन्स, वॉल स्ट्रीट ते जपानच्या निक्केई पर्यंत याचे धक्के जाणवले. पुढेही शेअर बाजार कोसळण्याचा धोका आहे. याला चीन कारणीभूत ठरला आहे. चीनची सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी एव्हरग्रँड (Evergrande) कर्जात बुडाल्याने जगभरातील अब्जाधीश गुंतवणूकदारांच्या चिंता वाढल्या आहेत. (Evergrande crisis shows cracks in China’s property market) 2 / 11 या एका कंपनीने जगभरातील शेअरबाजारा गदागदा हलविले आहेत. दुसरे कारण म्हणजे अमेरिकेचे अर्थमंत्री जेनेट सेलेन यांनी बेसुमार कर्ज झाल्याने आर्थिक नुकसान होणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच संसदेत त्यांनी अशा कर्जांवर लगाम लावण्याची विनंती केली आहे. या दोन कारणांमुळे सर्व बाजार धडाम झाले आहेत. 3 / 11 जगभरातील शेअर बाजारांना अव्हरग्रँड संकटामुळे हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. एवढा उत्पात माजविणारी ही कंपनी आहे तरी काय.. चला जाणून घेऊया, या अज्ञात कंपनीबाबत. 4 / 11 एव्हरग्रँडची सुरुवात 1996 मध्ये झाली. बाटलीबंद पाणी विकण्याचा व्यवसाय ही कंपनी करत होती. नंतर कंपनीने रिअल इस्टेटमध्ये उतरत मध्यम वर्गासाठी एक जबरदस्त स्कीम सुरु केली आणि काही वर्षांतच कंपनी चीनच्या रिअल इस्टेट बाजारातील सर्वात मोठी कंपनी बनली. 5 / 11 सध्या एव्हरग्रँडकडे चीनच्या 280 शहरांतील 1300 हून अधिक प्रकल्प आहेत. ही कंपनी चीनचा प्रोफेशनल फुटबॉल संघ ग्वांगझू फुटबॉल क्लबची मालकही आहे. या कंपनीचे मध्यम वर्गीयांमध्ये चांगले नाव आहे. 6 / 11 या काळात कंपनीवर 300 अब्ज डॉलरचे कर्ज झाले. यंदा जेव्हा चीनने आपल्या डिजिटल अर्थव्यवस्था आणि डिजिटल एज्युकेशन सारख्या क्षेत्रांवर नियम कडक केले तेव्हा रिअल इस्टेट क्षेत्रातही अफवा पसरली. कर्ज लिमिटमध्ये आणण्यासाठी चीन एक सीलिंग ठरवू शकते. गेल्या वर्षीदेखील चीनने रिअल इस्टेट कंपन्यांच्या मालकांसाठी नियम बनविले होते. यामुळे त्यांना मिळणाऱ्या कर्जावर नियंत्रण आले होते. 7 / 11 या भीतीतून एव्हरग्रँडने आपला व्यवसाय विकण्यास सुरुवात केली. परंतू कोरोना महामारीमुळे चीनची सुस्त झालेल्या अर्थव्यवस्थेतून या कंपनीला मोठी सूट देवून संपत्ती विकावी लागली. यातून कंपनीने पैसे जमविले परंतू ते एवढे कमी होते की कंपनीला 3 अब्ज डॉलरवरील व्याजाची रक्कम 8.4 कोटी डॉलर चुकती करणे देखील कठीण गेले. हा पैसा व्यवसाय सुरु ठेवणे आणि कर्मचाऱ्यांचा पगार देणे यासाठीच खर्च झाला आहे. 8 / 11 एव्हरग्रँड बुडाली तर मोठे आर्थिक संकट निर्माण होणार आहे. या कंपनीचे 800 हून अधिक प्रोजेक्ट निर्माणाधीन आहेत. यामुळे या प्रोजेक्टमध्ये पैसे लावणाऱ्यांचा देखील पैसा बुडणार आहे. 9 / 11 जगभरातील अनेक कंपन्या एव्हरगँडसोबत व्यवसाय करतात. बांधकाम, डिझाईन, मटेरिअल सप्लाय या क्षेत्रातील या कंपन्यांवर देखील मोठा परिणाम होणार आहे. त्यांचा करोडोंचा माल एव्हरग्रीनला दिलेला आहे. यामुळे काही कंपन्या दिवळखोरीत निघण्याची देखील शक्यता आहे. 10 / 11 एव्हरग्रँडने चीनमधील 171 बँका आणि 121 आर्थिक संस्थांकडून कर्ज उचलली आहेत. हे कर्ज बुडाले तर या बँका देखील दिवाळखोरीत निघण्याची शक्यता आहे. जर कंपनीने व्याज भरले नाही तर त्या बँका देखील ग्राहकांना कमी व्याज देतील, तसेच कर्जदारांना जास्त व्याज दर आकारतील. यामुळे चीनसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेला हे पेलविणारे नाही. 11 / 11 एव्हरग्रँडमुळे अब्जाधीश एलन मस्क यांना मोठा फटका बसला आहे. जेफ बेजोस यांच्यासह ५०० हून अधिक अब्जाधीशांचे एकाच दिवसात १० लाख कोटी रुपये बुडाले आहेत. आणखी वाचा