Expensive house posh but expensive What is LTV limit And what is the right time for refinance
महागडे घर 'पॉश', पण खिसा करेल 'वॉश'...LTV लिमिट म्हणजे काय? अन् रिफायनान्सची योग्य वेळ कोणती? By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 12:14 PM1 / 8गेल्या वर्षभरात व्याजदर वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे घर खरेदीचे स्वप्न महाग झाले आहे. मात्र, आता श्रीमंतांनाही महागडे घर खरेदी करण्यासाठी खिसा आणखी हलका करावा लागणार आहे. 2 / 8आरबीआयने ७५ लाख रुपयांपेक्षा अधिकच्या गृहकर्जावर लोअर रिस्क वेटेज प्रमाणाची सुविधा संपुष्टात आणली आहे. त्यामुळे या कर्जावरील व्याजदर ०.१ टक्क्यांनी वाढणार आहे. 3 / 8आरबीआयने ७५ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या कर्जवरील लाेन टू व्हॅल्यू प्रमाणही वाढविले आहे. त्यामुळे या श्रेणीतील ग्राहकांना गृहकर्ज घेण्यासाठी घराच्या किमतीपैकी २५ टक्के रक्कम आधी जमा करावी लागेल. त्यानंतरच कर्ज मिळेल. 4 / 8मूल्यांकनाच्या आधारे बॅंका कर्ज देतात. सदनिकेची किंमत १ कोटी रूपये असल्यास बॅंक ७५ लाख रुपयेच कर्ज देईल. मालमत्तेच्या ७५ टक्के मूल्याचेच कर्ज मिळेल. म्हणजेच सुरुवातीलाच या ग्राहकांना जास्त पैसे द्यावे लागतील.5 / 8२.५ टक्के व्याजदर वाढला आहे. अशावेळी कर्ज बुडण्याची जाेखीम वाढते. त्यामुळे आरबीआयने लोअर रिस्क वेटेज सुविधा मागे घेतली आहे. ईएमआय वाढला आहे. मात्र, नव्या ग्राहकांना बॅंका कमी व्याजदराने कर्ज देत आहेत. त्यामुळे गृहकर्ज रिफायनान्स करणे किंवा इतर बॅंकेत ट्रान्सफर केल्यास फायदा ठरेल, असे तज्ज्ञ सांगतात.6 / 8कर्जाची रक्कम ३० लाख रुपयांपर्यंत असेल तर एलटीव्ही प्रमाण ९० टक्के आणि डाउन पेमेंट १० टक्के इतकं असतं. कर्जाची रक्कम ३० ते ५० लाखा असेल तर एलटीव्ही ८० टक्के आणि डाऊन पेमेंट २० टक्के इतकं करावं लागेल. कर्जाची रक्कम ७५ लाखाहून जास्त असेल तर एलटीव्ही प्रमाण ७५ टक्के आणि डाऊन पेमेंट २५ टक्के.7 / 8२९.३५% गृहकर्ज वाटप २५ ते ५० लाख रुपयांपर्यंतचे झाले आहे. तर ३६.४०% गृहकर्ज वाटप ५० लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे झाले आहे.8 / 8एप्रिल २०२२ मध्ये जुन्या कर्जावरील दर ६.५० ते ६.९०% इतका होता. तर नव्या कर्जावरील दर ६.५० ते ६.९०% इतका होता. फेब्रुवारी २०२३ मध्ये जुन्या कर्जावरील दर ९.०० ते ९.४०% आणि नव्या कर्जावरील दर ८.५० ते ८.७५% इतका झाला आहे. एप्रिल २०२३ मधली आकडेवारी पाहता जुन्या कर्जावरील दर ९.०० ते ९.४०% आणि नव्या कर्जावरील दर ८.८५ ते ९.१५% आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications