शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Price Hike : सोनं आणखी महाग होणार; 80,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर जाण्याची शक्यता...!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 7:03 PM

1 / 9
या धनत्रयोदशीला आपण सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, गुंतवणुकीच्या दृष्टीने ही आपल्यासाठी चांगली खरेदी सिद्ध होऊ शकते. तर जर आपल्याकडे सोने पडून असेल, तर खूश व्हायला हरकत नाही. कारण सोन्याची किंमत मोठी उसळी घेण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
2 / 9
कच्चे तेल, अॅल्युमिनियम, तांबे आणि कोळसा, यांसह अनेक वस्तूंच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. यामुळे आता पुढचा नंबर सोन्याचा असल्याचे मानले जात आहे. येत्या काही दिवसांत सोन्याचा दर (Gold Price) 80,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. अर्थात, आताच्या तुलनेत सोने तब्बल 40 टक्क्यांहून अधिक महाग होऊ शकते. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करत आहेत.
3 / 9
सोन्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढण्याची भविष्यवाणी - तज्ज्ञांच्या मते, सोन्याची किंमत प्रति औंस 1800 डॉलरवरून 3,000 डॉलर प्रति औंस होऊ शकते. कॅनडाचे खाण क्षेत्रातील दोन सर्वात मोठे तज्ज्ञ, गोल्डकॉर्प इंकचे माजी प्रमुख डेव्हिड गारोफालो आणि रॉब मॅकवेन यांच्या मते, जागतिक महागाई दिसून आल्यामुळे अशा परिस्थितीत सोन्याची मागणी वाढणार आहे, यामुळे मोठा परिणाम होऊ शकतो. सोन्याचा दर प्रति औंस 3,000 डॉलरपर्यंत पोहोचू शकते.
4 / 9
याचे रूपांतर रुपयांत केल्यास, आज देशात 49,600 रुपये प्रति 10 ग्रॅम असलेले सोने 80,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचू शकते. एक औंस म्हणजे, 28.3495 ग्रॅम. सोमवारी सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 49610 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. म्हणजेच भारतात सध्या एका औंस सोन्याची किंमत 1,40,613 रुपये आहे.
5 / 9
आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किमतीत वाढ झाली, तर भारतात एक औंस सोन्याचा भाव 2,25,00 रुपयांच्या पुढे जाईल आणि त्याचे रूपांतर ग्रॅममध्ये केल्यास, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 80,000 रुपयांच्या पुढे जाऊ शकते.
6 / 9
महंगाईमुळे वाढू शकतात दर - तज्ज्ञांच्या मते, जगभरातील केंद्रीय बँकांचा मदत निधी आणि कमी व्याज धोरणांमुळे बाजारातील पैसा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे महागाईचा दर वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे, सोन्याच्या दरात तेजी येऊ शकते.
7 / 9
गुंतवणूकदार किमतीतील घसरणीचा फायदा घेत त्यांच्या पोर्टफोलिओमधील सोन्यातील गुंतवणूक वाढवतील. जेव्हा-जेव्हा महागाई वाढते तेव्हा सोन्याची मागणीही वाढते. लोक त्यांच्या भांडवलाचे संरक्षण करण्यासाठी सोन्यात गुंतवणूक वाढवतात.
8 / 9
भारतात सोन्याची मागणी वाढली - सणासुदीबरोबरच लग्नांचा हंगामही जवळ येत आहे. अशा परिस्थितीत भारतातही सोन्याच्या मागणीत तेजी दिसत आहे. गेल्या वर्षी एप्रिल-सप्टेंबरच्या तुलनेत यंदा एप्रिल-सप्टेंबरमध्ये सोन्याच्या आयातीत २५२ टक्क्यांची वाढ झाली आहे.
9 / 9
गेल्या वर्षी या कालावधीत, 6.8 अब्ज डॉलरचे सोने आयात करण्यात आले होते, तर या वर्षी तब्बल 24 अब्ज डॉलर्सचे सोने आयात करण्यात आले आहे. केवळ सप्टेंबरमध्येचे 5.11 अब्ज डॉलरचे सोने आयात केले गेले आहे.
टॅग्स :GoldसोनंMarketबाजार