शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Extra Income Formula : महिन्याला वेतनाइतकी रक्कम मिळवा, पगाराला हात लावायची गरज नाही; करा 'हा' उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 4:51 PM

1 / 9
नोकरदार वर्गाची सर्वात मोठी अडचण ही आहे की, जेव्हा अचानक मोठ्या रकमेची गरज भासते तेव्हा नातेवाईकाकडून उसणे पैसे किंवा बँकेकडून वैयक्तिक कर्ज घ्यावे लागते. याशिवाय, एखादी वस्तू घेण्यासाठीही महिनाभर पगाराची वाट पाहावी लागते. त्यामुळे काहीजण गुंतवणूकीचे वेगवेगळेय पर्याय शोधत असतात.
2 / 9
पण, जर तुम्हाला सांगितले की तुमचा जितका पगार आहे, तितकीच सेव्हिंग तुम्ही महिन्याला करू शकता किंवा महिन्याच्या पगाराला हात न लावता महिनाभराचा खर्च बाजुला काढून ठेवू शकता, तर तुमचा विश्वास बसेल का..?तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे..? पण, हे शक्य आहे. यामागे गुंतवणूकीचे एक गणित काम करते.
3 / 9
तुम्ही खाजगी नोकरी करत असाल तर तुम्हाला हे गणित समजणे खूप गरजेचे आहे. तुमचा पगार काहीही असो, तुम्ही महिन्याला मोठी रक्कम वाचवू शकता. उदाहरणार्थ, तुमचा पगार 30 हजार रुपये महिना आहे आणि तुम्हाला दरमहा 30 हजार रुपये वेगळे उत्पन्न हवे आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत तुमच्या पगाराच्या 30 टक्के रक्कम गुंतवावी लागेल.
4 / 9
म्हणजेच महिन्याला 30 हजार रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला त्याच्या पगारातील 9000 रुपये गुंतवावे लागतील. आता हे पैसे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवले जाऊ शकतात. SIP कॅल्क्युलेटरनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने दर महिन्याला Rs 9000 ची SIP केली, तर त्याला 10 वर्षात 15% रिटर्ननुसार सुमारे 25,07,915 रुपये मिळतील.
5 / 9
आता हे गणित अधिक सोप्या पद्धतीने समजून घेऊया...एसआयपीमध्ये दरमहा 9000 रुपये गुंतवल्यास 5 वर्षात ही रक्कम सुमारे 8 लाख रुपये होईल. गुंतवणुकदारांनी पुढील तीन वर्षांपर्यंत अशाच प्रकारे अधिक पैसे जमा करत राहिल्यास 8 वर्षानंतर ही ठेव वाढून 16.73 लाख रुपये होईल आणि 10 मध्ये रक्कम 25 लाखांपेक्षा जास्त असेल.
6 / 9
हे फक्त सुरुवातीच्या पगारानुसार अंदाजित आहे. बहुतेक लोकांचा पगार 7 ते 8 वर्षात दुप्पट होतो. पगारात वार्षिक 10% वाढ झाली तर 8 वर्षात दरमहा 30 हजार रुपये कमावणाऱ्या व्यक्तीचा पगार 60 हजार रुपयांपेक्षा जास्त होईल. गुंतवणुकदाराने पगार वाढवण्यासोबतच गुंतवणुकीची रक्कमही वाढवली तर 10व्या वर्षी गुंतवणूकदाराच्या पगारात महिन्याला 18,000 रुपये वाचण्यास सुरुवात होईल.
7 / 9
मी तुम्हाला सांगतो, गुंतवणूकदाराला मुद्दलापेक्षा व्याज नेहमीच प्रिय असते. पण जेव्हा तुम्ही गुंतवणूक कराल तेव्हाच व्याज मिळेल. नोकरदार लोकांचे उत्पन्न हळूहळू वाढते. म्हणूनच आजच्या युगात SIP हा एक उत्तम पर्याय आहे, ज्याद्वारे तुम्ही छोट्या गुंतवणुकीतून मोठा निधी बनवू शकता.
8 / 9
जेव्हा तुम्ही तुमच्या पगाराच्या 30% रक्कम 10 वर्षांसाठी गुंतवता, तेव्हा 10 वर्षांनंतर तुमच्याकडे किमान 25 लाख रुपये असतील. एवढेच नाही तर या काळात पगारवाढीतील उरलेली रक्कम इतर ठिकाणी गुंतवता येईल. जसे की स्टॉक मार्केट, पीपीएफ, गोल्ड बॉन्ड्स, रिअल इस्टेट आणि शॉर्ट टर्म फंड.
9 / 9
10 वर्षांनंतर तुम्ही मिळालेल्या परताव्यांची मोजणी करता तेव्हा तुम्हाला असे दिसून येईल की तुमचा जितका पगार आहे, तितकीच रक्कम गुंतवणुकीतून मिळत आहे. मात्र, दरमहा पगाराच्या 30 टक्के बचत करणे आणि ते गुंतवणे थोडे कठीण आहे. परंतु जेव्हा तुम्ही उत्पन्न आणि खर्च यांच्यात समतोल साधता तेव्हा कोणतीही अडचण येणार नाही.
टॅग्स :Investmentगुंतवणूकbusinessव्यवसाय