शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

UPI Transaction फेल झाले, तर बँक तुमच्या खात्यात रोज 100 रुपये टाकणार; जाणून घ्य़ा RBI चा नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 1:53 PM

1 / 10
बँक ग्राहकांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा नियम माहिती नसल्याने बँकांमध्ये अधिकारी, कर्मचारी सांगतील तीच पूर्व दिशा मानावी लागते. बँकांमध्ये लंच टाईमच नसतो, असे देखील समोर आले आहे. अशातच आता डिजिटल पेमेंट केले आणि त्यात काही समस्या आली तर बँकेत जाण्यापेक्षा वाट पाहत राहणे सोईचे ठरते. (If your UPI transaction fails and money deducted, then in two days auto reverse not done, see RBI Guideline.)
2 / 10
RBI आता बँकांच्या मनमानीवर उपाय करू लागले आहे. काही वर्षांपूर्वी देशात युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आणि आयएमपीएस (IMPS) सेवा सुरु झाली आहे. याचा अनेकजण लाभही घेत आहेत. एकही पैसा शुल्कासाठी न लागता लगेचच हे पैसे दुसऱ्याच्या खात्यात वळते होत आहेत.
3 / 10
असे असले तरीदेखील या प्रणालीत काही त्रुटी आहेत. काहीवेळा युपीआय ट्रान्झेक्शन (upi transaction fail) फेल होते. पाठविणाऱ्याच्या खात्यातून पैसे कापले जातात, परंतू समोरच्याला ते मिळत नाहीत. अशात ते पैसे कुठेतरी सिस्टिममध्ये अडकतात.
4 / 10
कोरोना महामारीमुळे सध्या युपीआय पेमेंटला प्राधान्य दिले जात आहे. अनेकांनी असे पेमेंटही केले आहे. मात्र, ट्रान्झेक्शन फेल झाल्याने अनेकांचे नुकसानदेखील झाले आहे. जर तुमच्यासोबत असे झाले असेल किंवा भविष्यात जर झाले तर भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने नवीन नियम बनविला आहे. चला जाणून घेऊया....
5 / 10
जर तुमचे युपीआय़ ट्रान्झेक्शन फेल झाले आणि तुमच्या खात्यातून कापलेले पैसे ठरलेल्या वेळामध्ये परत नाही आले तर त्यानंतर बँक तुम्हाला दररोजचे 100 रुपये देण्यास बाध्य असणार आहे.
6 / 10
सप्टेंबर 2019 मध्ये आरबीआयने फेल्ड ट्रान्झेक्शनवर नवीन सर्क्युलर जारी केले आहे. यानुसार कापलेले पैसे परत करण्यासाठी एक वेळ निश्चित करण्यात आली आहे. या वेळेत सेटलमेंट झाली नाही तर बँकेला त्या ग्राहकाला नुकसान भरपाई द्यावी लागते. यानंतर बँक दररोजचे 100 रुपये त्या ग्राहकाला देणार आहे.
7 / 10
आरबीआयनुसार फेल झालेल्या युपीआय ट्रान्झेक्शनचे पैसे लाभार्थ्याला मिळाले नाहीत तर ऑटो रिव्हर्सल तारखेपासून म्हणजेच T+1 दिवसांत पूर्ण व्हावे. इथे T म्हणजे ट्रान्झेक्शन कधी केले त्याची तारीख आहे. म्हणजेच तिसऱ्या दिवशी ते पैसे परत मिळायला हवेत.
8 / 10
अशा ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठीदेखील आरबीआयने व्यवस्था केली आहे. तुम्ही तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडे याची तक्रार करू शकता. यासाठी तुम्हाला तुम्ही वापरत असलेल्या अॅपवरील रेझ डिस्प्यूटवर जावे लागेल. जर तुमची तक्रार योग्य असेल तर पैसे परत केले जातील.
9 / 10
जर तक्रार करूनही बँकेने तुम्हाला पैसे परत केले नाहीत तर आरबीआयच्या डिजिटल ट्रान्झेक्शन, 2019 अंतर्गत देखील तक्रार करता येते.
10 / 10
युपीआय म्हणजे यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस, जो आंतरबँक पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा आहे. मोबाईल नंबर किंवा व्हर्च्युअल आयडीजद्वारे हे पैसे वळते करता येतात. एनपीसीआयद्वारे ही सुविधा देण्यात येते.
टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकBanking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँकgoogle payगुगल पेPaytmपे-टीएम