शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Fastag युजर्सना मोठा दिलासा, सरकारने KYC अपडेट करण्याची मुदत वाढवली!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 8:56 AM

1 / 9
नवी दिल्ली : फास्टॅगबाबत (Fastag) मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (NHAI) फास्टॅग केवायसी (Fastag KYC) अपडेट करण्याची तारीख वाढवली आहे.
2 / 9
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने फास्टॅग केवायसी अपडेट करण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदत दिली आहे. यापूर्वी केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२४ होती. आता फास्टॅगचे केवायसी २९ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करता येणार आहे.
3 / 9
भाषा या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (X) एका पोस्टमध्ये केवायसीची अंतिम मुदत वाढवण्याबाबत माहिती दिली आहे.
4 / 9
यामध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने म्हटले आहे की, 'फास्टॅग युजर्स! 'वन व्हेइकल वन फास्टॅग' अभियान राबविण्याची आणि तुमच्या फास्टॅगसाठी केवायसी अपडेट करण्याची अंतिम मुदत २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे.'
5 / 9
दरम्यान, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल संकलन सुरू केल्याने देशभरातील नाक्यांवर गर्दी होण्याचे प्रमाण घटले आहे. वाहनधारकांचा नाक्यांवर होणारा खोळंबा फास्टॅगमुळे कमी झाला आहे.
6 / 9
फास्टॅगची केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची, याचीही माहिती अनेक वाहनधारकांना नाही. दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण न केल्यास त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे याची प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे.
7 / 9
वाहनावर लावलेल्या फास्टॅगचे केवायसी पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम https://fastag.ihmcl.com या वेब पोर्टलवर जा. आपला रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि पासवर्डच्या आधारे आपल्या काउंटवर लॉग इन करा.
8 / 9
यानंतर आलेला ओटीपी सबमिट करून तुमच्या फास्टॅगच्या व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करा. लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डवर दिसत असलेल्या 'माय प्रोफाइल' या ऑप्शनवर क्लिक करा. या ठिकाणी रजिस्ट्रेशनवेळी दिलेली सर्व माहिती दिसू लागते.
9 / 9
केवायसी पूर्ण करण्यासाठी 'माय प्रोफाइल' सेक्शनमध्ये 'केवायसी' या पर्यायावर जा. यानंतर आवश्यक ओळखपत्र तसेच पत्त्यासंबंधित माहिती भरा. तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि पत्त्यासाठी लागणारा पुरावा अपलोड केल्यानंतर फास्टॅगची केवायसी प्रक्रिया पूर्ण होते.
टॅग्स :Fastagफास्टॅगtollplazaटोलनाका