जाणून घ्या FASTag कोणत्या गाड्यांसाठी अनिवार्य, कुठून तयार कराल आणि किती लागेल शुल्क By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 11:18 AM
1 / 15 मध्यरात्री १२ वाजल्यापासून (१५-१६ फेब्रुवारी मध्यरात्र) देशभरातील सर्व गाड्यांसाठी FASTag अनिवार्य केलं जाणार आहे. अशातच जर तुम्ही उद्या सकाळी राष्ट्रीय महामार्गावरून बाहेर जाण्याच्या विचारात असाल तर तुमच्या गाडीवर FASTag असणं अनिवार्य आहे. 2 / 15 जर तुमच्या गाडीची नंबर प्लेट सफेद रंगाची आहे तर महामार्गावरील टोल नाक्यांवरून पुढे जाण्यासाठी आता FASTag असणं आवश्यक आहे. जर तुमच्या गाडीवर FASTag नसेल तर तुमच्याकडून दुहेरी टोल वसूल करण्यात येईल. 3 / 15 दुचाकी वाहनांसाठी FASTag हा अनिवार्य नाही. NHAI म्हणेजच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या महामार्गांवर दुचाकी वाहनांकडून टोल वसूली केली जात नाही. 4 / 15 जर तुम्ही कमर्शिअल वाहन चावताय. म्हणजेच तुमच्या गाडीची नंबर प्लेट पिवळ्या रंगाची आहे तर तुम्हाला महामार्गांवर टोल नाक्यांवरून पुढे जाण्यासाठी FASTag अनिवार्य आहे. 5 / 15 NHAI नं देशभरात ४० हजारांपेक्षा अधिक केंद्र सुरू केली आहेत. त्या ठिकाणी वाहन चालकांना नवा FASTag तयार करून मिळतो. 6 / 15 याव्यतिरिक्त फ्लिपकार्ट, पेटीएम, अन्य डिजिटल वॉलेट कंपन्या किंवा बँकांकडूनही FASTag जारी करण्यात येतो. 7 / 15 FASTag हा युपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे रिचार्ज करता येऊ शकतो. जर तुमचा FASTag तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर त्यातून पैसे कापले जातात. 8 / 15 नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं FASTag ची किंमत ही १०० रूपये निश्चित केली आहे. याव्यतिरिक्त वाहन चालकांना २०० रूपयांचं सिक्युरिटी डिपॉझिटही द्यावं लागतं. 9 / 15 तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनाच्या नोंदणीची कागदपत्रे जमा करून FASTag खरेदी करू शकता. याव्यतिरिक्त बँक केवायसीसाठी पॅन कार्ड आणि आधार कार्डाची कॉपीही द्यावी लागते. 10 / 15 FASTag स्कॅन होण्यासाठी वाहनचालकांनी ताशी २५ ते ३० किमी या वेगात टोलनाक्यावरील FASTag मार्गिकेवर प्रवेश करावा लागेल. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) टॅग पाहून त्याची पडताळणी केली जाईल. त्यानंतर वाहनाला पुढे जाता येईल. 11 / 15 मार्गिकेतून बाहेर पडताना अधिक वेळ लागल्याल बूम बॅरियर वाहनावर कोसळेल. तसंच पडताळणी झाली नसल्यास वाहनधारकाला मार्गिकेतून वाहन बाजूला जाऊन टोलपावती घ्यावी लागेल. FASTag वैध नसल्यास दुप्पट टोलआकारणी केली जाईल. 12 / 15 FASTag वॉलेटमध्ये आता किमान बॅलन्स ठेवण्याचं बंधन काढून टाकण्यात आलं आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानं बुधवारी याबाबत माहिती देत FASTag वॉलेटमध्ये किमान बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं. 13 / 15 टोल नाक्यांवर वाहनांची गर्दी न होता वाहनांना सहजरित्या ये जा करता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी कार/जीप/वॅनसाठी FASTag वॉलेटमध्ये सिक्युरिटी डिपॉझिटसह किमान रक्कम ठेवणं अनिवार्य करण्यात आलं होतं. 14 / 15 तसंच FASTag वॉलेटमध्ये किमान रक्कम नसल्यास चालकांना टोल नाक्यांवरून जाण्याची परवानगी नव्हती. हायवे अथॉरिटीच्या या निर्णयानंतर आता प्रवासी वाहतुकीच्या गाड्यांना याचा फायदा मिळणार आहे. 15 / 15 जर वाहनचालकाच्या FASTag वॉलेटमध्ये थोडी रक्कम असेल आणि वाहन टोल नाका पार केल्यानंतर ती रक्कम मायनसमध्ये गेली तर त्याच्या सिक्युरिटी डिपॉझिटमधून ती रक्कम कमी केली जाईल. जेवढी रक्कम त्यातून कमी होईल तेवढी पुढच्या वेळी वॉलेटमध्ये भरताना कमी करून उर्वरित रक्कम भरली जाईल. आणखी वाचा