शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पैसा दुप्पट करण्यासाठी RD की FD? कोणता पर्याय उत्तम? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 12:32 PM

1 / 8
गुंतवणूक करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. यात कुणी एफडी, आरडी, एलआयसी, शेअर्स, म्युच्युअल फंड इत्यादी पर्यायांचा अवलंब करतात. पण कमीत कमी जोखीम पत्करुन हक्काचे रिटर्न्स मिळावेत यासाठी बहुतेक जण आरडी किंवा एफडीचा पर्याय निवडतात.
2 / 8
एफडी की आरडी? नेमकं कशात गुंतवणूक केली तर चांगले रिटर्न्स मिळतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याची माहिती आपण आता जाणून घेऊयात. दोन्ही पर्यायांच्या काही जमेच्या बाजू आहेत.
3 / 8
Fixed Deposit (FD) मध्ये तुम्हाला एकदाच एकरकमी पैसा जमा करावा लागतो. तर Recurring Deposit (RD)मध्ये हप्त्याच्या स्वरुपात तुम्हाला पैसे जमा करण्याची सुविधा मिळते.
4 / 8
जर तुमच्याकडे एकरकमी गुंतवणूक करण्यासाठीचा पैसा असेल तर एफडीचा पर्याय निवडू शकता. तर ज्यांच्याकडे एकरकमी पैसा नाही, पण दैनंदिन पातळीवर किंवा मासिक स्तरावर बचत करणं ज्यांना योग्य वाटतं अशांसाठी आरडी हा उत्तम पर्याय आहे.
5 / 8
एफडीचा कमीत कमी कालावधी सात दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंत असतो, तर आरडीसाठीचा कमीत कमी कालावधी सहा महिन्यांपासून ते कमाल कालावधी १० वर्ष इतका असू शकतो.
6 / 8
दोन्ही पर्यायांमध्ये मिळणाऱ्या व्याजाची तुलना केली गेल्यास एफडीची मुदत पूर्ण झाली की आरडीमध्ये मिळणाऱ्या व्याजापेक्षा एफडीमध्ये अधिक व्याज मिळतं. आरडीमध्ये दरमहा स्तरावर व्याज जमा केलं जातं. तर एफडीमध्ये तुमच्या ठेवीची मुदत संपली की व्याज मिळतं.
7 / 8
एफडीमध्ये तुम्हाला एकाचवेळी रक्कम जमा करावी लागते. त्यामुळे वारंवार बँकेच्या फेऱ्या किंवा त्याच्याशी निगडीत इतर काही कामं करावी लागत नाहीत. थेट तुम्ही तुमच्या ठेवीची मुदत संपली की बँकेत जाऊन तुमची ठेव व्याजासह परत मिळवू शकता.
8 / 8
आरडीमध्ये ठराविक कालावधीमध्ये तुम्हाला पैसे जमा करावे लागतात. त्यामुळे हप्ता चुकला तर बँक तुमचं खातं बंद देखील करू शकतं. त्यामुळे अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. तुम्हाला ठराविक तारखेला तुम्ही ठरवून दिलेली रक्कम जमा करणं बंधनकारक ठरतं.
टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँक