File ITR even if it does not come under Income Tax slab Learn more about future benefits
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 11:34 AM1 / 6Income Tax Returns: असे अनेक लोक आहेत जे टॅक्स स्लॅबमध्ये न आल्याने इन्कम टॅक्स भरत नाहीत. पण टॅक्स स्लॅबमध्ये येत नसलात तरी इन्कम टॅक्स भरायलाच हवा, असं आर्थिक तज्ज्ञांचं मत आहे. भविष्यात तुम्हाला याचा अनेक लाभ मिळतो आणि तुमची सर्व अवघड कामंही सहज पार पडतात. जाणून घ्या असेच ५ मोठे फायदे.2 / 6आजच्या काळात घर, जमीन, कार किंवा कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी बहुतांश लोक कर्ज घेतात. कर्ज घेताना तुमच्याकडे तुमच्या उत्पन्नाचा पुरावा मागितला जातो. अशा तऱ्हेनं नोकरी करत असलेले लोक कंपनीची पगाराची स्लिप दाखवू शकतात, पण जे काम करत नाहीत, ते उत्पन्नाचा पुरावा कसा देणार? अशावेळी गेल्या २-३ वर्षांच्या इन्कम टॅक्स रिटर्नची प्रत कामी येते आणि कर्ज मिळणं सोपं होतं. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) हा कोणत्याही व्यक्तीच्या उत्पन्नाचा भक्कम पुरावा असतो.3 / 6जेव्हा आपण दुसऱ्या देशात प्रवास करता तेव्हा आपल्याला व्हिसा मिळणं आवश्यक आहे. व्हिसा देण्याच्या प्रक्रियेत अनेक देशांचे व्हिसा अधिकारी इन्कम टॅक्स रिटर्नची प्रत मागतात. आयटीआरच्या माध्यमातून आपल्या देशात येणाऱ्या किंवा येऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीची आर्थिक स्थिती काय आहे, हे तपासलं जातं. ज्यांना स्वत: कमावत नाहीत, ते त्यांच्यासाठी त्यांच्या पालकांच्या आयटीआरची प्रत देऊ शकतात.4 / 6५० लाख किंवा १ कोटी अथवा त्यापेक्षा जास्त रकमेची विमा पॉलिसी खरेदी करताना त्यासाठी आयटीआर रिटर्न दाखवावं लागतं. एलआयसीमध्ये तुम्हाला विशेषत: ५० लाख किंवा त्यापेक्षा जास्त टर्म पॉलिसी घेण्यासाठी आयटीआर कागदपत्रांची मागणी केली जाईल. यावरून आपण एवढ्या मोठ्या रकमेचा विमा काढण्यास पात्र आहात की नाही हे ठरवलं जातं.5 / 6जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करत असाल ज्यामध्ये तुम्हाला सरकारी विभागाकडून कंत्राट मिळवायचं असेल तर तुमच्यासाठी आयटीआर भरणं खूप महत्वाचं आहे. सरकारी खात्यात कंत्राट घेण्यासाठी गेल्या ५ वर्षांचा आयटीआरही आवश्यक आहे.6 / 6आजकाल ऑनलाइन इन्कम टॅक्स रिटर्न भरला जातो. मात्र, मॅन्युअली भरल्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्नची पावती नोंदणीकृत पत्त्यावर पाठविली जाते. यासह तो पत्ता म्हणूनही स्वीकारला जातो. आयटीआर उत्पन्नाबरोबरच पत्त्याचा पुरावा ठरतो. आणखी वाचा Subscribe to Notifications