शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Financial Planning : मुलांच्या भविष्यासाठी पैशांची कमी पडू द्यायची नाहीये? मग आजच करा हे काम, तयार होईल मोठा फंड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 10:42 AM

1 / 9
आपली मुलं कायमच सुखी राहावी हेच आपल्याला हवं असतं. आपल्या मुलांचं भविष्य चांगलं आणि उज्ज्वल व्हावं अशीच प्रत्येक पालकांची इच्छाही असते. मुलांच्या शिक्षणावर आणि लग्न कार्यावर खूप खर्च होतो. अशा स्थितीत आर्थिक नियोजन अत्यंत महत्त्वाचं असतं.
2 / 9
जे नियोजन तुम्ही घर खरेदीसाठी, वाहन घेताना किंवा रिटायरमेंटसाठी करता, असंच काही मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आवश्यक असतं. या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत, ज्याचं पालन करून तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य उत्तम करू शकता.
3 / 9
आपण किती मोठ्या खर्चाची योजना आखत आहोत हे प्रथम शोधून काढावं लागेल. समजा तुमची मुलगी / मुलगा २०३० मध्ये पदवीधर होईल. यानंतर तुम्हाला त्याला टॉप बिझनेस-स्कूलमध्ये शिकवायचं आहे. यासाठी तुम्हाला आर्थिक तयारी करायची आहे.
4 / 9
२०२१ मध्ये IIM अहमदाबादमध्ये २ वर्षांच्या एमबीए प्रोग्रामची फी २३ लाख रुपये होती. गेल्या दोन दशकांत हे शुल्क दरवर्षी १२ टक्क्यांनी वाढलं आहे. याच प्रमाणात हिशोब केला असता, २०३० मध्ये हे शुल्क ६४ लाख रुपये असेल.
5 / 9
त्याचप्रमाणे, पालकांना प्रत्येक ध्येयासाठी सध्याच्या खर्चानुसार भविष्यातील खर्चाची गणना करावी लागेल. यावरून तुम्हाला तुमच्या मुलाच्या आर्थिक भविष्यासाठी केव्हा आणि किती पैसे लागतील याची कल्पना येईल.
6 / 9
मुलांसाठी आर्थिक नियोजनाचं सर्वात सामान्य ध्येय म्हणजे उच्च शिक्षण हे असतं. सर्वसामान्य ग्राहकांची महागाई ८ टक्क्यांच्या आसपास वाढत असताना शिक्षणाची महागाई १० टक्क्यांच्या आसपास वाढत आहे. आता तुम्हाला अशा गुंतवणुकीच्या पर्यायाची गरज आहे जो या महागाई दराच्या बरोबरीने किंवा त्याहून अधिक परतावा देऊ शकेल.
7 / 9
१०, १२ किंवा १५ वर्षांच्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी पालक अधिक आक्रमकपणे गुंतवणूक करू शकतात. संपूर्ण गुंतवणूक इक्विटीमध्ये गुंतवू शकतात. अर्थात, येथे तुम्हाला प्रचंड चढ-उतारांसाठी तयारही राहावं लागेल, परंतु येथे तुम्हाला चांगला परतावा मिळण्यासाठी भरपूर वाव आहे.
8 / 9
तुमच्या इमिडिएट गोल्ससाठी बचत खातं, एफडी, लिक्विड आणि शॉर्ट टर्म डेट फंड वापरा. तर, दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी, इक्विटी म्युच्युअल फंड, सोनं आणि सुकन्या समृद्धी योजनेसारखी निश्चित उत्पन्नाची साधनं एकत्र वापरा. एसआयपीद्वारे तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता.
9 / 9
कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून मुलांसाठी गुंतवणूक केली तर मोठा निधी तयार होऊ शकतो. अमेरिकेत अनेक ठिकाणी आई-वडील, आजी-आजोबा, काका, काकू सर्व कुटुंबातील सर्व मुलांच्या शिक्षण निधीमध्ये दरमहा काही रक्कम टाकत असतात. प्रत्येक व्यक्ती वेगळी रक्कम देऊ शकते. यामुळे खूप पैसे वाचतात. थोडी थोडी गुंतवणूक करून तुम्ही याद्वारे मोठा फंड तयार करू शकता. (टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)
टॅग्स :InvestmentगुंतवणूकMONEYपैसा