शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mutual Fund मध्ये पहिल्यांदाच पैसा गुंतवताय?; त्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 5:08 PM

1 / 15
म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटर आपल्याला सांगतं की विशिष्ट कालावधीत आपले पैसे कसे वाढतील. परंतु कोणत्या म्युच्युअल फंडामुळे तुमचे पैसे वाढतील हे ते सांगत नाहीत.
2 / 15
म्युच्युअल फंडामध्ये पैसे कमविण्यासाठी आपल्याकडे एक रणनीती असणं आवश्यक आहे.
3 / 15
तज्ज्ञांच्या मते, जर कोणी प्रथमच म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणार असेल तर लार्ज कॅप फंड ही त्यांची पहिली पसंती असावी.
4 / 15
त्यानंतर गुंतवणूकदारानं इंडेक्स फंडाला प्राधान्य द्यावं असं सांगण्यात येतं.
5 / 15
आतापर्यंत प्रथमच म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांसाठी लार्ज-कॅप आणि इंडेक्स फंड हा सर्वाधिक पसंतीचा गुंतवणूक पर्याय ठरला आहे. त्यात जोखीम कमी असल्यामुळे नफा मिळवता येऊ शकतो.
6 / 15
तथापि, हे लक्षात ठेवले पाहिजे की म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे. कोणतीही म्युच्युअल फंड स्कीम जोखीम मुक्त नाही.
7 / 15
लाइव्ह मिंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या या वृत्तामध्ये कर आणि गुंतवणूक तज्ज्ञ जितेंद्र सोलंकी म्हणतात की, 'पहिल्यांदा आपण म्युच्युअल फंडामध्ये गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी लार्ज कॅप म्युच्युअल फंड अधिक उत्तम ठरेल.
8 / 15
या फंडांमध्ये फंड मॅनेजर्स टॉप १०० सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. यात स्मॉल आणि मीडिअम शेअर्सच्या तुलेनत बरंच कमी डेविएशन पाहायला मिळतं. यामुळे, लार्ज-कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करणार्‍या फंडांमध्येदेखील धोका कमी असतो.
9 / 15
Mirae Asset Large Cap Direct Growth Fund, Axis Blue Chip Direct Growth Fund आणि Canara Rebeco Bluechip Direct Growth Fund मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला जितेंद्र सोलंकी यांनी दिला आहे.
10 / 15
तसंच डायरेक्ट ग्रोथ प्लॅनमध्येही गुंतवणूक करा असंही त्यांनी नमूद केलं. यामागचं कारण असं आहे की डायरेक्ट ग्रोथ प्लॅनमध्ये ब्रोकरची भूमिका कमी होते आणि गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत १-१.५ टक्के अतिरिक्त म्युच्युअल फंड व्याज मिळतं.
11 / 15
यासह, तुम्हाला जर एकरकमी गुंतवणूक करता येणार नसेल तर आपण एसआयपीमार्फत गुंतवणूक करा, असंही ते म्हणाले.
12 / 15
goodmoneying.com च्या मनीकिरण सिंघल यांच्या म्हणण्यानुसार पहिल्यांदा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी इंडेक्स फंडदेखील उत्तम पर्याय आहे.
13 / 15
यामध्ये जोखीम कमी असते आणि त्याची प्रगतीही इंडेक्सच्या प्रगतीशी जोडलेली असते.
14 / 15
पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांनी UTI Nifty 50, HDFC Nifty 50 आणि HDFC Sensex यात गुंतवणूक करू शकतात, असा सल्लाही त्यांनी दिला.
15 / 15
याशिवाय निरनिराळ्या म्युच्युअल फंड्सच्या इंडेक्स फंड्सवर येणार्या एक्सपेन्सेसवर नजर टाकली तर फंडांवर येणारा एक्सपेन्स जितका अधिक असेल तितका तुमचा रिटर्न अधिक असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
टॅग्स :InvestmentगुंतवणूकMONEYपैसाshare marketशेअर बाजार