शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Multibagger Stocks : ५ रूपयांपेक्षा कमी किंमतीच्या पाच शेअर्सनं एका वर्षातच बनवलं गुंतवणूकदारांना कोट्यधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 1:48 PM

1 / 10
2022 Multibagger Stock High Returns : जरी पेनी स्टॉकमध्ये (Penny Stocks) पैसे गुंतवणे (Investment) खूप जोखमीचे आहे. परंतु जर तुम्हाला योग्य स्टॉक सापडला तर तो तुम्हाला लखपतीपासून कोट्यधीश बनवू शकतो.
2 / 10
अवघ्या 40 पैशांपासून ते 4.25 रुपयांपर्यंतच्या काही शेअर्सनं एका वर्षात 3158 ते 17025 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स दिले आहेत. म्हणजेच ज्यांनी वर्षभरापूर्वी या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील, त्यांचे ३२ लाख रुपये मंगळवारपर्यंत एक कोटी 71 लाखांपेक्षा अधिक झाले आहेत.
3 / 10
सर्वप्रथम आपण सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडबद्दल पाहू. वस्त्रोद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या या स्मॉल कॅप कंपनीचे (Small Cap Company) शेअर्स गेल्या वर्षभरात 1.85 रुपयांवरून 242.85 रुपयांपर्यंत वाढले आहेत.
4 / 10
या कालावधीत शेअर 13027 टक्क्यांनी वधारला. म्हणजेच वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवणाऱ्या गुंतवणूकदाराच्या रकमेचं मूल्य आता 1 कोटी 31 लाखांच्या वर गेली असेल.
5 / 10
प्रोसीड इंडिया लिमिटेड एक शेतीशी संबंधित कंपनी आहे. ही कृषी / फलोत्पादन / पशुधन क्षेत्रात सक्रिय आहे. या कंपनीचे शेअर्स अवघ्या एका वर्षात 68.50 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच गेल्या वर्षभरात यात 17025 टक्क्यांची वाढ झाली आहे.
6 / 10
प्रोसिड इंडियाच्या शेअर्सची किंमत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ज्या व्यक्तीनं यामध्ये वर्षभरात एक लाख रुपये गुंतवले होते, त्या एक लाखाचे मूल्य 1 कोटी 71 लाखांपेक्षा जास्त झाले असतील.
7 / 10
त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणारा दुसरा स्टॉक म्हणजे डिग्जॅम लि. वस्त्रोद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या या कंपनीचे मार्केट कॅप 301.40 कोटी रुपये आहे. डिग्झमचे शेअर्स गेल्या एका वर्षात 3.85 रुपयांवरून मोठ्या प्रमाणात वाढले.
8 / 10
मंगळवारी बाजार बंद होताना या शेअरची किंमत 150.70 रुपयांपर्यंत गेली होती.. या शेअरने एका वर्षात ३८१४ टक्के रिटर्न्स दिला आहेत.
9 / 10
दुसरीकडे, जर आपण छोट्या स्टॉकबद्दल बोललो, तर त्यातील चौथं नाव म्हणजे सेजल आर्क आहे. सेजल आर्किटेक्चरल ग्लास लि. ग्लास क्षेत्रात सक्रिय आहे आणि या कंपनीचं मार्केट कॅप 1.39 कोटी रुपये आहे. या समभागाने आपल्या गुंतवणूकदारांना एका वर्षात 3158 टक्के नफा दिला आहे. एका वर्षातील 4.25 रुपयांवरून मंगळवारी शेअर 138.50 रुपयांवर पोहोचला.
10 / 10
दुसरीकडे, MIC Electronics Ltd. चे शेअर्स एका वर्षात 65 पैशांपासून 19.15 रुपयांवर पोहोचले आणि या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनं 2846 टक्के परतावा दिला. MIC Electronics इलेक्ट्रीक/इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात कार्यरत आहे आणि सध्या या कंपनीचे मार्केट कॅप 105.45 कोटी आहे. टीप : कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
टॅग्स :businessव्यवसायStock Marketशेअर बाजारMONEYपैसा