Fixed Deposits: If you invest Rs 1 lakh, you will get Rs 1.23 lakh, find out the details
Fixed Deposits : 1 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळतील 1.23 लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 3:31 PM1 / 6नवी दिल्ली : पैसे वाचवण्यासाठी आणि सुरक्षितपणे परतावा मिळवण्यासाठी मुदत ठेवी (Fixed Deposits) हा नेहमीच सर्वोत्तम पर्याय मानला जातो. मात्र, इक्विटी मार्केटच्या तुलनेत यामध्ये रिटर्न कमी मिळते. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला अशाच काही बँकांची माहिती देणार आहोत, ज्या तीन वर्षांसाठी फिक्स डिपॉझिटवर (FD Interest Rate) 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहेत.2 / 6सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ही सर्वोत्तम व्याजदर देणार्या बँकांपैकी एक आहे. ही तीन वर्षांच्या फिक्स डिपॉझिटवर 7 टक्के व्याज देते. तुम्ही तीन वर्षांसाठी 1 लाख रुपयांचे फिक्स डिपॉझिट केल्यास तुम्हाला जवळपास 1.23 लाख रुपयांचा परतावा मिळेल.3 / 6RBL बँक तीन वर्षांच्या फिक्स डिपॉझिटवर 6.50 टक्के व्याजदर देते. सर्वोत्तम व्याजदर देणार्यांपैकी ही देखील आहे. जर तुम्ही RBL बँकेत तीन वर्षांसाठी 1 लाख रुपयांचे फिक्स डिपॉझिट केल्यास तुम्हाला जवळपास 1.21 लाख रुपये मिळतील.4 / 6येस बँक तीन वर्षांच्या फिक्स डिपॉझिटवर 6.25 टक्के व्याजदर देत आहे. या बँकेसोबत तुम्ही तीन वर्षांसाठी 1 लाख रुपयांचे फिक्स डिपॉझिट केल्यास, तुमचा एफडी कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सुमारे 1.20 लाख रुपये परत मिळतील.5 / 6इंडसइंड बँक तीन वर्षांच्या फिक्स डिपॉझिटवर 6 टक्के व्याज देत आहे. जर तुम्ही या बँकेत 1 लाख रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवले तर तीन वर्षांत ते जवळपास 1.19 लाख रुपये होतील.6 / 6या सर्व बँका ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याजदर देतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही स्वत: ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकासाठी फिक्स डिपॉझिट घेत असाल तर तुम्हाला वर नमूद केलेल्या व्याजदरापेक्षा जास्त व्याज मिळेल. आणखी वाचा Subscribe to Notifications