Flood water in the car heavy rain you can get these benefits from insurance companies
कारमध्ये पुराचं पाणी गेलंय?, विमा कंपन्यांकडून घेऊ शकता ‘हे’ फायदे By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 3:46 PM1 / 8मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिथी निर्माण झाली आहे. तर अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं आहे. सोशल मीडिया आणि टीव्हीवर अशी अनेक दृश्ये पाहायला मिळतात ज्यात घरे, दुकाने आणि वाहनांचं नुकासन झाल्याचंही दिसतं. परंतु अशा वाहनांचा विमा उतरवला असेल, तर विमा कवच तुम्हाला मिळते. 2 / 8या कव्हरपैकी एक म्हणजे फ्लड इन्शूरन्स. म्हणजेच पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई. जर तुम्ही वाहन विमा घेतला असेल आणि पुरात वाहनाचं नुकसान झालं असेल, तर तुम्हाला विमा संरक्षण अंतर्गत भरपाई मिळण्याचा अधिकार आहे. नुकसान झाल्यास तुम्हाला कोणते चार प्रकारचे फायदे मिळतात ते जाणून घेऊ या.3 / 8आपल्या शरीरात जसं हृदय असतं तसंच गाडीचं इंजिनही काम करतं. पुराचं पाणी जर इंजिनमध्ये गंल, तर इंजिन पूर्णपणे किंवा त्यातील काही पार्ट्स खराब होऊ शकतात. याच्या भरपाईसाठी तुम्ही आपल्या विमा कंपनीशी संपर्क साधू शकता.4 / 8कारमध्ये अनेक प्रकारच्या इलेक्ट्रिक वस्तू असतात. त्यातही पाणी गेल्यास त्या खराब होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत तुम्ही फ्लड डॅमेज कव्हरनं भरपाई करू शकता.5 / 8पुराचं पाणी कारच्या आत गेल्यास इंटिरिअरही खराब होऊ शकतं. कारच्या आतील सिट्स, कारपेट आणि फर्निशिंगचं सामान खराब होऊ शकतं. याच्या भरपाईसाठीदेखील तुम्ही विमा कंपनीशी संपर्क साधू शकता. 6 / 8गिअरबॉक्समध्ये पाणी गेल्यास तेदेखील खराब होऊ शकतं. यामुळे गाडीचा गिअर काम करणार नाही. सोबतच अन्य समस्याही उद्भवू शकतात. याचीदेखील भरपाई तुम्हाला विमा कंपनीकडून मिळू शकते.7 / 8पावसात जर तुमची गाडी अडकली असेल तर पुढील टीप्स नक्की फॉलो करा. कार पाण्यात अडकली असेल तर पुश स्टार्टिंगनं कधीही कार सुरू करू नका. बॅटरी लगेच डिस्कनेक्ट करा आणि टो करून गाडी वर्कशॉपपर्यंत न्या.8 / 8पाण्यात गाडी कायम खालच्या गिअरमध्ये चालवा. तसंच एकच स्पीड कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. घरातून निघण्यापूर्वी कारचे ब्रेक तपासून पाहा. पुराच्या परिस्थितीतून बाहेर आल्यावर कारचे ब्रेक तपासा. पाण्याची पातळी गाडीपेक्षा कमी झाली तरी त्वरित ती सुरू करण्याचा प्रयत्न करू नका. आणखी वाचा Subscribe to Notifications