शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'हे' सात नियम पाळा, नंतर मजेत जगा! अन्यथा अचानक संकट ओढवले तर खूप हाल होऊ शकतात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 8:34 AM

1 / 9
निवृत्तीनंतर आयुष्य जगत असलेले ज्येष्ठ नागरिक, पतीने अकाली निधन झाल्याने एकट्याने आयुष्य जगणाऱ्या विधवा महिला किंवा एकटे राहणारे यांच्यावर अचानाक संकट ओढवले तर खूप हाल होऊ शकतात.
2 / 9
या स्थितीला तोंड देण्यासाठी आधीच आर्थिक तजवीज करणे कधीही चांगले. दर महिन्याची मिळकत आणि खर्च याचा लेखाजोखा मांडून काही पैसे बाजूला काढलेच पाहिजेत. काही गोष्टी पाळल्या तर याचे नियोजन करणे नक्कीच शक्य आहे.
3 / 9
उत्पन्न, म्युच्युअल फंड, मालमत्ता खरेदी, एसआयपी किंवा इतर गुंतवणुकीसाठी वेगवेगळी बँक खाती नको. दोनच खाती ठेवावी. एक खाते येणारी मिळकत किंवा पेन्शन आणि दुसरे अन्य बाबींसाठी
4 / 9
उत्पन्नावर कर, खात्यांवरील मर्यादा, क्रेडिट कार्ड मर्यादा, चुकवणुकीच्या पद्धती, ऑनलाइन व्यवहार, लागणारे पासवर्ड आदी बाबी शिकून घ्यावा. कुणावर अवलंबून राहाणे टाळा.
5 / 9
मॅच्युरिटीनंतर गुंतवलेली रक्कम वेळेवर काढून घ्या. मोठी रक्कम कोणत्याही परताव्याशिवाय पडून आहे, असे होऊ देऊ नका. प्रत्येक योजनेत ठराविक कालांतरासाठी तुम्हाला पैसे काढण्याचे किंवा गुंतविण्याचे पर्याय दिलेले असतात.
6 / 9
एखादी गुंतवणूक योजना, मिळकत आदी बाबी फक्त तुमच्यापुरत्याच ठेवा. त्याचा फार गवगवा करणे टाळा. गुंतवणूक पर्यायांची चर्चा करताना रक्कम किती आहे, हे जाहीर करणे टाळा.
7 / 9
जोरदार परताव्यासाठी इतरजण काय करतात हे ऐकून त्यामागे जाण्याचा मोह टाळावा, दीर्घकालीन पर्यायांवर विश्वास ठेवावा. निवडलेल्या गुंतवणूक पर्यायांचे सतत मूल्यमापन करावे.
8 / 9
भविष्यातील खर्च, मुलांचा शिक्षण आदींवर होणारा खर्च, आरोग्य उपचारांसाठी लागू शकणारा खर्च याचा विचार करून शक्यतो काटकसर करा. वायफळ खर्च टाळा.
9 / 9
वाढत्या वयानुसार वेळोवेळी आरोग्य तपासणी करा. खाणे-पिणे आणि व्यायामाच्या सवयी अंगीकारा. तुमचा उत्साह, उमेद, सकारात्मकता कायम राहील अशाच मित्रपरिवारांच्या संगतीत राहा.
टॅग्स :Investmentगुंतवणूक