शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Forbe's Rich List 2023: एकेकाळी करत होते ८ हजारांची नोकरी, आज निखिल कामथ आहेत सर्वात तरुण भारतीय अब्जाधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 1:57 PM

1 / 9
फोर्ब्सनं जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांची (२०२३) यादी जाहीर केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी भारतीय श्रीमंतांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. या यादीतील सर्वात मोठे यश ब्रोकिंग फर्म झिरोदाचे (Zerodha) सह-संस्थापक निखिल कामथ (Nikhil Kamath) यांनी मिळवलं आहे.
2 / 9
सर्वात तरुण भारतीय अब्जाधीश म्हणून त्यांना या यादीत स्थान देण्यात आलंय. अवघ्या ८ हजार रुपयांच्या नोकरीपासून सर्वात तरुण भारतीय अब्जाधीश होण्यापर्यंतचा निखिल कामथ यांचा प्रवास खूपच रंजक आहे. चला जाणून घेऊया त्यांच्याबद्दल.
3 / 9
फोर्ब्सनुसार बंगळुरूच्या या दोन्ही भावांचं नेटवर्थ १.१ अब्ज डॉलर्स आणि २.७ अब्ज डॉलर्स इतकं आहे. एक ड्रॉपआऊट ते अब्जाधीशापर्यंतचा कामथ यांचा प्रवास अतिशय रंजक आहे. त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर इथपर्यंत प्रवास केलाय. झिरोदा सध्या तेजीनं वाढणारी स्टॉक ब्रोकिंग कंपनीही आहे.
4 / 9
ह्युमन्स ऑफ बॉम्बेला (Humans of Bombay) निखिल कामथ यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आपला जीवन प्रवास उलगडला. त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षी काम करण्यास सुरुवात केली. त्यांची पहिली नोकरी एका कॉल सेंटरमध्ये होती, जिथे त्यांना फक्त ८ हजार रुपये पगार मिळायचा. यानंतर शेअर मार्केट ट्रेडिंगनं त्यांचा हा प्रवास सुरू झाला.
5 / 9
निखिल कामथ यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी शेअर ट्रेडिंग सुरू केलं तेव्हा त्यांनी ते गांभीर्यानं घेतलं नाही. मात्र, वर्षभरातच त्यांना बाजाराची व्हॅल्यू समजली आणि त्यांनी त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही, त्यांची संपत्ती एवढ्या वेगानं वाढली की आज ते देशातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून समोर आले आहेत.
6 / 9
एकदा आपल्या वडिलांनी आपण काही जमवलेली रक्कम त्यांना दिली आणि त्यात मॅनेज करण्यास सांगितलं. तो कामथ यांचं बाजारातील एन्ट्रीचं पहिलं राऊल होतं, असं निखिन कामथ यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं. वडील डोळे बंद करून आपल्यावर विश्वास ठेवत होते.
7 / 9
त्यांच्या या विश्वासामुळेच मोठी जबाबदारीही होती की त्यांनी दिलेली रक्कम नीट वापरावी. हळू हळू त्यांचा यात जम बसू लागला आणि त्यांची चांगली कमाई होऊ लागली. यानंतर त्यांनी नोकरी करणं सोडून दिलं आणि इथूनच झिरोदाचा प्रवास सुरू झाला.
8 / 9
नोकरी सोडल्यानंतर निखील कामथ यांनी त्यांचा मोठा भाऊ नितीन कामथ यांच्यासोबत कामथ असोसिएट्सची सुरुवात केली आणि या माध्यमातून ते शेअर मार्केटमध्ये व्यवहार करायचे. यानंतर २०१० मध्ये दोन्ही भावांनी मिळून झिरोदाची सुरूवात केली.
9 / 9
आतापर्यंतच्या संघर्षातून आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळाल्या. आज मी कदाचित अब्जाधीश झालो आहे, पण यानंतरही काहीही बदललं नाही. आजही मी दिवसातील बहुतांश वेळ काम करतो आणि आयुष्यात या सर्व गोष्टी चुकल्या तर..? याची भीती वाटते,' असंही ते म्हणाले.
टॅग्स :businessव्यवसायshare marketशेअर बाजार