former company director complaint and urges sebi to stall the offering of paytm ipo
Paytm ला मोठा धक्का! IPO रोखा, गंभीर आरोप करत माजी संचालकांची सेबीकडे मागणी By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 1:00 PM1 / 13गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराची विक्रमी घोडदौड सुरू असून, शेअर बाजाराने ५५ हजारांचा टप्पा गाठला असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच बाजारात अनेकाविध क्षेत्रातील कंपन्यांचे IPO येऊन धडकत आहेत.2 / 13त्यामुळे गुंतवणूकदारांना उत्तमोत्तम संधी प्राप्त होत असल्याचे सांगितले जात आहेत. तर कोरोना संकटाच्या काळातही अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात तेजीत आले असून, चांगले रिटन्सही कंपन्या देत आहेत. (Paytm IPO)3 / 13यातच आता Paytm कडून मोठा IPO सादर होणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर आता कंपनीतील समभागधारकांनी शिक्कामोर्तब झाले असून, सेबीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 4 / 13मात्र, भांडवली बाजारातून निधी उभारण्यास परवानगी मिळालेल्या डिजिटल पेमेंट क्षेत्रातील Paytm च्या आयपीओ प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता आहे. कंपनीचे माजी संचालक अशोक कुमार यांनी IPO प्रस्ताव रोखण्याची विनंती भांडवली बाजार नियंत्रक सेबीला केली आहे.5 / 13याउलट, सक्सेना यांचे आरोप फेटाळून लावत Paytm ने दिल्लीमध्ये पोलीस तक्रार केली आहे. ज्यात IPO मध्ये गुंतवणूकदार पैसे गमावू शकतात, असा त्यांचा आरोप आहे. 6 / 13सक्सेना यांनी Paytm चे सहसंस्थापक असल्याचा दावा केला असून, पेटीएमकडून मात्र हा दावा फेटाळण्यात आला आहे. सक्सेना यांनी २० वर्षांपूर्वी कंपनीमध्ये २७ हजार ५०० डॉलर्सची गुंतवणूक केली होती. त्यांना आजतागायत कंपनीचे शेअर प्राप्त झाले नाहीत, असा आरोप केला आहे.7 / 13Paytm ने 'वन ९७ कम्युनिकेशन'मध्ये हिस्सेदारी आणि शेअरहोल्डर्ससोबतचे करार पत्र पोलिसांकडे सादर केले आहे. यात सक्सेना सहसंस्थापक असल्याचे कुठेही म्हटलेले नाही. हे प्रकरणी कायदेशीर कचाट्यात सापडल्याने पेटीएमची IPO प्रक्रिया रखडण्याची शक्यता आहे. 8 / 13२००३-२००४ या वर्षात Paytm ने भारतीय कंपनीला काही शेअर्स हस्तांतर केले होते, त्यावेळी सक्सेना यांची ती अंतर्गत बाब होती. प्रत्यक्षात सक्सेना यांनी कोणतेही शेअर स्वीकारले नाहीत किंवा असा कोणताही आपसातील व्यवहार झाला, असे पेटीएमकडून सांगण्यात आले आहे. 9 / 13नोव्हेंबर २०२१ पर्यंत Paytm चा शेअर भांडवली बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. तसेच सुमारे १६ हजार ६०० कोटींच्या IPO ला मान्यता देण्यात आल्याचे समजते.10 / 13Paytm ने जवळपास २४ ते ३० अब्ज डॉलर्सच्या दरम्यान बाजार मूल्याची अपेक्षा केली आहे. सध्याच्या घडीला पेटीएमचे बाजार मूल्य १६ अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांचे कंपनीचे प्रवर्तक म्हणून अवर्गीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. 11 / 13Paytm च्या IPO योजनेत ७५ टक्के शेअर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. शेअर विक्रीतून प्राप्त होणाऱ्या निधीमध्ये ४ हजार ३०० कोटी कंपनीच्या वृद्धीसाठी वापरण्यात येणार आहेत. तसेच २ हजार कोटी नवीन व्यवसायिक विस्तारासाठी वापरले जातील, असे कंपनीने म्हटले आहे.12 / 13Paytm मध्ये Ant ग्रुप आणि अलिबाबा यांची पेटीएमची मुख्य कंपनी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशनमध्ये जवळपास ३८ टक्के हिस्सेदारी आहे. तर, सॉफ्टबँकेचा यामध्ये १८.७३ टक्के हिस्सा आहे. तर एलिवेशन कॅपिटलची वन ९७ कम्युनिकेशनमध्ये १७.६५ टक्के हिस्सेदारी आहे.13 / 13आयपीओच्या नियोजनासाठी पेटीएममध्ये नुकताच संचालक मंडळात फेरबदल केले होते. पेटीएमच्या प्रमुख शेअरधारकांमध्ये चीनच्या अलिबाबा समुहाच्या अँट ग्रुप, सॉफ्टबँक व्हिजन फंड, सॅफ पार्टनर्स यांचा समावेश आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications