former rbi governo raghuram rajan says india dangerously close to hindu rate of growth
'हिंदू ग्रोथ रेट' नेमकं आहे तरी काय? ज्यामुळे रघुराम राजनही चिंतेत, ४५ वर्ष जुनं कनेक्शन! By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 2:53 PM1 / 9रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांनी हिंदू ग्रोथ रेटबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की भारत हिंदू ग्रोथ रेटच्या अतिशय धोकादायक स्तराच्या जवळ पोहोचला आहे. 2 / 9देशाच्या आर्थिक विकासासाठी ही एक मोठी समस्या असल्याचंही ते म्हणाले. खासगी क्षेत्रातील मर्यादित गुंतवणूक, वाढलेले व्याजदर आणि जागतिक विकासाची मंद वाटचाल यासाठी हिंदू ग्रोथ रेटच खरं कारण असल्याचं राजन यांचं म्हणणं आहे. 3 / 9सर्वात आधी जाणून घेऊ की हे हिंदू ग्रोथ रेट म्हणजे नेमकं काय? तर ही टर्म इंडियन इकोनॉमिक ग्रोथ रेटची निच्चांकी पातळी दर्शवण्यासाठी वापरली जाते. याचा सर्वप्रथम उल्लेख १९७८ साली करण्यात आला होता आणि भारतीय अर्थतज्ज्ञ राज कृष्ण यांनी संथ गतीनं वाढणाऱ्या विकास दराचं वर्णन करण्यासाठी या शब्दाचा वापर केला होता. पीटीआयच्या रिपोर्टनुसार साल १९५० च्या दशकापासून १९८० पर्यंत भारताचा विकास दर सरासरी जवळपास ४ टक्के इतका होता. 4 / 9साल १९४७ मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाची आर्थिक परिस्थिती खूप हलाकीची होती. कृषी प्रधान देशात गरीबीचा स्तर खूप मोठ्या प्रमाणात होता. यासोबतच सार्वजनिक सुविधांची वानवा होती. यानंतरच्या काही दशकांमध्ये देशाचा विकास दर खूप संथ राहिला. 5 / 9देशाच्या आर्थिक परिस्थितीच्या या संथ गतीचं शब्दात वर्णन करण्यासाठी Hindu Growth Rate हा शब्द वापरण्यात आला. आताही या शब्दाचा उपयोग देशाच्या कमी विकास दराचे वर्णन करण्यासाठी केला जातो. 6 / 9गेल्या महिन्यात नॅशनल स्टॅटस्टिक्स ऑफीसनं राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकड्यांच्या आधारावर रघुराम राजन यांनी म्हटलं होतं की तिमाहीच्या आधारावर विकास दरात सातत्यानं घट होताना पाहायला मिळत आहे. 7 / 9आकडेवारीनुसार चालू वित्तीय वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी ६.३ टक्क्यांनी आणि पहिल्या तिमाहीत १३.२ टक्क्यांनी घसरुन अवघा ४.४ टक्के इतका राहिला. याआधी गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा ५.२ टक्के इतका राहिला. रघुराम राजन यांनी सांगितलं की ही आकडेवारी खरंच चिंतेचं कारण आहे. 8 / 9रिपोर्टमध्ये पुढील आर्थिक वर्षात इकोनॉमिक ग्रोथ आणखी कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आरबीआयचे माजी गर्व्हनरनं सांगितलं की सिक्वेन्शल स्लो-डाउन खूप चिंतेचा विषय आहे. खासगी क्षेत्र गुंतवणूक करण्यास इच्छुक राहिलेलं नाही. 9 / 9आरबीआयकडून सातत्यानं व्याज दरात वाढ केली जात आहे. या सगळ्यात जागतिक विकास दर देखील कमी राहण्याची शक्यता आहे. तसंच पुढील आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारतीय विकास दर ५ टक्के राहिला तर आपण खरे नशीबवान ठरू, असंही रघुराम राजन म्हणाले. आणखी वाचा Subscribe to Notifications