Fortune 500 Global List Reliance Industries out of top 100 list Improvement in SBIs ranking
Fortune 500 Global List: रिलायन्स इंडस्ट्रीज टॉप १०० कंपन्यांच्या यादीतून बाहेर; SBI च्या रँकिंगमध्ये सुधारणा By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 8:42 AM1 / 10Mukesh Ambani’s Company RIL Slips in Fortune 500 Global List: देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries -RIL) फॉर्च्युन ग्लोबल ५०० लिस्टमध्ये तब्बल ५९ स्थान घसरून टॉप १०० कंपन्यांच्या यादीतून बाहेर झाली आहे.2 / 10२०२० या वर्षादरम्यान Fortune 500 Global List मध्ये RIL चं रँकिंग ९६ होतं, जे २०२१ मध्ये घसरून १५५ झालं. याच दरम्यान सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रँकिंगमध्ये १६ स्थानांची सुधारणा झाली आहे. 3 / 10सोमवारी Fortune 500 Global List जाहीर करण्यात आली. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या झालेल्या घसरणीला कोरोना महासाथ (COVID-19 pandemic) जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे. कंपनीला मिळालेलं रँकिंग हे २०१७ पासूनच सर्वात खराब रँकिंग आहे. 4 / 10फॉर्च्युन ग्लोबल ५०० लिस्टमध्ये (Fortune 500 Global List) यावेळीही अमेरिकन कंपनी वॉलमार्ट (Walmart) ५२४ अब्ज डॉलर्सच्या उत्पन्नासह प्रथम स्थानावर राहिली. 5 / 10वॉलमार्ट ही कंपनी सलग आठव्या वर्षी या लिस्टमध्ये प्रथम स्थानी आहे. १९९५ नंतर आतापर्यंत १६ वेळा वॉलमार्ट ही कंपनी या यादीत पहिल्या स्थानी राहिली आहे. 6 / 10३८४ अब्ज डॉलर्सचा महसूल मिळवणारी चीनची कंपनी स्टेट ग्रिड या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्या तुलनेत रिलायन्स इंडस्ट्रीजचा महसूल फॉर्च्युन ग्लोबल ५०० यादीनुसार २५.३ टक्क्यांनी घसरून ६३ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.7 / 10२०२१ च्या फॉर्च्युन ग्लोबल ५०० यादीत अमेरिकन कंपनी अॅमेझॉन (Amazon) २८० अब्ज डॉलर्सच्या उत्पन्नासह तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. चीनची नॅशनल पेट्रोलियम चौथ्या तर सिंगापूरची सायनोपेक ग्लोबल ही कंपनी पाचव्या स्थानी आहे. 8 / 10या यादीत इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या (IOC) रँकिंगमध्ये ६१ स्थानांची घसरण होऊन ती २१२ व्या क्रमांकावर गेली. तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रँकिंगमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सुधारणा झाली असून ती १६ स्थान वर जाऊन २०५ व्या स्थानावर पोहोचली आहे. 9 / 10स्टेट बँकेच्या रॅकिंमध्ये सातत्यानं सुधारणा होताना दिसत आहे. गेल्या वर्षी स्टेट बँके रँकिंगमध्ये १५ स्थानांनी वर गेली होती. यावर्षी बँक १६ स्थानांनी वर गेली आहे. 10 / 10ही यादी तयार करणाऱ्या फॉर्च्युननुसार ३१ मार्च २०२१ किंवा त्यापूर्वी संपलेल्या आर्थिक वर्षादरम्यान कमावलेल्या एकून उत्पन्नाला कंपन्यांच्या रँकिंगचा आधार बनवण्यात आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications