शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या आठवड्यात येणार चार IPO; गुंतवणूकदारांना मिळणार कमाईची मोठी संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 11:06 AM

1 / 12
गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात IPO येताना दिसत आहे. आयपीओच्या माध्यमातून अनेक गुंतवणूकदारांना कमाईची संधी मिळाली. परंतु तुम्ही जर आयपीओमध्ये गुंतवणूक केली नसेल तर आता पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक संधी चालून आली आहे.
2 / 12
गेल्या आठवड्यात चार आयपीओ आले होते. तर दुसरीकडे या आठवड्यातही चार आयपीओ येण्याच्या तयारीत आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारांना आता पुन्हा एकदा पैसे कमावण्याची संधी मिळणार आहे.
3 / 12
या आठवड्यात Aptus हाऊसिंग फायनॅन्स, कारट्रेड टेकक, Chemplast Sanmar आणि Nuvoco Vistas यांचे आयपीओ येणार आहेत. यापैकी काही आयपी आजच उघडले आहेत. तर काही आयपीओमध्ये उद्यापासून नोंदणी करता येणार आहे.
4 / 12
चेन्नईच्या Aptus हाऊसिंग फायनॅन्सचा आयपीओ १० ऑगस्ट म्हणजेच मंगळवारी ओपन होणार आहे. तसंच तो १२ ऑगस्ट रोजी बंद होईल.
5 / 12
या इश्यूसाठी शेअर्सची किंमत ३४६-३५३ रूपयांदरम्यान ठेवण्यात आली आहे. या आयपीओद्वारे कंपनी एकूण २,७८० कोटी रूपये जमवणार आहे.
6 / 12
ऑनलाईन कारट्रेड टेकचा आयपीओ ९ ऑगस्ट रोजी म्हणजेच आज उघडला आहे. हा आयपीओ ११ ऑगस्ट पर्यंत खुला राहिल. याचा प्राईज बँड १५८५-१६१८ रूपयांदरम्यान असेल.
7 / 12
कंपनी याच्या अंतर्गत ऑफर फॉर सेलसाठी १,८५,३२,२१६ इक्विटी शेअर्स जारी करणार आहे. या आयपीओद्वारे जवळपास २,९९८.५१ कोटी रूपये जमवले जाऊ शकतात.
8 / 12
स्पेशलिटी केमिकल मॅन्युफॅक्चरर कंपनी Chemplast Sanmar चा आयपीओ १० ऑगस्ट रोजी उघडेल आणि १२ ऑगस्ट रोजी बंद होणार आहे. या शेअरचा प्राईज बँड ५३०-५४१ रूपये ठेवण्यात आला आहे. कंपनी याद्वारे ३,८५० रूपये जणा करू शकते.
9 / 12
देशामधल्या सिमेंट क्षेत्रातील पाचवी मोठी कंपनी तब्बल ५ हजार कोटींचा आयपीओ सादर करत आहे. नूवोको विस्तास कॉर्पोरेशन लिमिटेड असे या कंपनीचे नाव असून, क्षमतेच्या बाबतीत पूर्व भारतामधील सर्वात मोठी सिमेंट कंपनी मानली जाते.
10 / 12
नूवोको विस्तासने IPO योजना जाहीर केली आहे. सोमवार ९ ऑगस्ट २०२१ रोजी खुली होत असून, बुधवार ११ ऑगस्ट २०२१ रोजी बंद होईल. यासाठी प्रति शेअर ५६० ते ५७० रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे.
11 / 12
नूवोको विस्तास कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारतामधील एक अग्रगण्य रेडी मिक्स कॉंन्क्रीट निर्मातादारही आहे. कंपनीकडून ५ हजार कोटींचा एकूण प्रस्ताव आहे.
12 / 12
३१ मार्च २०२१ रोजी पर्यंत कंपनीकडे ११ सिमेंट प्रकल्प आहेत. त्यांची एकत्रित स्थापित निर्मिती क्षमता २२.३२ एमएमटीपीए आहे. कंपनीच्या नेतृत्व टीमची जबाबदारी चेअरमन व नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हिरेन पटेल आणि मॅनेजिंग डायरेक्टर जयकुमार कृष्णास्वामी यांच्याकडे आहे.
टॅग्स :IPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंगshare marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसा