शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 8:43 AM

1 / 7
आजच्या काळात एटीएम कार्ड (ATM Card) न वापरणारे फारच कमी लोक असतील. प्रधानमंत्री जनधन योजना (Pradhan Mantri Jan Dhan Yojana)आणि रुपे कार्डमुळे (RuPay Card) एटीएम हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. यामुळे रोख रकमेवरील अवलंबित्व तर कमी झालेच, शिवाय व्यवहारही सोपे झाले आहेत.
2 / 7
एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर ती एटीएम कार्डाच्या माध्यमातून सहज खरेदी करता येते. एटीएम कार्डाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. परंतु माहिती अभावी लोकांना त्याचा लाभ मिळत नाही. त्याचप्रमाणे प्रीमियम न भरता एटीएम कार्डाच्या माध्यमातून विमा मिळतो.
3 / 7
बँकेतूनच एटीएम कार्ड केली जातात. त्याचप्रमाणे कार्डधारकांना अपघाती विमा आणि अकाली मृत्यू विमा मिळतो. डेबिट/एटीएम कार्डवरही जीवन विम्याचं संरक्षण मिळतं, याची माहिती देशातील बहुतांश लोकांना नसते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार, पर्सनल अॅक्सिडेंटल इन्शूरन्स (डेथ) नॉन एअर विमा डेबिट कार्ड होल्डरला अकाली मृत्यूसाठी विमा दिला जातो.
4 / 7
जर तुम्ही कोणत्याही बँकेचं एटीएम कार्ड ४५ दिवसांपेक्षा जास्त काळ वापरलं असेल तर तुम्हाला मोफत विमा सुविधा मिळू शकते. यामध्ये अपघात विमा आणि जीवन विमा या दोन्हींचा समावेश आहे. आता या दोन्ही परिस्थितीत तुम्ही विम्याचा दावा करू शकाल.
5 / 7
कार्डच्या श्रेणीनुसार रक्कम निश्चित करण्यात आली आहे. एसबीआय आपल्या गोल्ड एटीएम कार्डधारकाला ४ लाख (death on air), २ लाख (non-air) कव्हर देते. तर प्रीमियम कार्ड कार्डधारकाला १० लाख (death on air), ५ लाख (non-air) कव्हर देते.
6 / 7
HDFC Bank, ICICI, Kotak Mahindra Bank सह सर्व बँका त्यांच्या डेबिट कार्डवर वेगवेगळ्या प्रमाणात कव्हर देतात. काही डेबिट कार्डवर ३ कोटी रुपयांपर्यंत मोफत अपघाती विमा संरक्षण दिलं जातं. हे विमा संरक्षण मोफत दिलं जाते. बँकेकडून अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केली जात नाही.
7 / 7
विम्याचा लाभ तेव्हाच मिळतो जेव्हा ठराविक कालावधीत त्या डेबिट कार्डद्वारे काही व्यवहार केले जातात. हा कालावधी वेगवेगळ्या कार्डसाठी वेगवेगळा असू शकतो. काही एटीएम कार्डवरील विमा पॉलिसी अॅक्टिव्हेट करण्यासाठी कार्डधारकाला ३० दिवसांतून एकदा तरी व्यवहार करणं आवश्यक असतं. तर काही कार्डधारकांना विमा पॉलिसी अॅक्टिव्हेट करण्यासाठी ९० दिवसांत एकदा व्यवहार करावा लागतो.
टॅग्स :businessव्यवसायbankबँक