शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नववर्षात SBIच्या एटीएममधून मिळतात 'या' मोफत सेवा, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2019 11:39 PM

1 / 8
SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया)ची देशभरात 43 हजारांहून जास्त ATM सेंटर आहेत. पैसे काढण्यासाठी आता ग्राहक बँकेत जाण्याऐवजी एटीएमचा सर्रास वापर करतात. त्यामुळे एसबीआयनं सर्व एटीएम मशिन अद्ययावत केल्या आहेत. ती एटीएम मशिन्स आपल्याला अनेक सुविधा देतात.
2 / 8
SBIच्या एटीएमद्वारे आपल्याला पिन क्रमांक मोबाईलच्या माध्यमातून जनरेट करून बदलता येतो. या सेवेसाठी कुठलंही शुल्क आकारलं जात नाही.
3 / 8
एटीएमद्वारे आपण कोणत्याही धार्मिक संस्थेला दान करू शकता. वैष्णवदेवी, शिर्डी साईसंस्थान, तिरुपती, तुळजाभवानी, महालक्ष्मी मंदिरात दान करता येते
4 / 8
बँक खात्यामध्ये शिल्लक असलेली रक्कम view balance पर्यायामुळे एटीएम मशिनमध्येच दिसते.एसबीआयच्या कोणत्याही एटीएमद्वारे तुम्हाला लाईफ प्रीमिअम भरता येते.
5 / 8
एसबीआयच्या कोणत्याही एटीएमद्वारे तुम्हाला लाईफ प्रीमिअम भरता येते.आता एटीएम मशिनमधूनही आपण धनादेशासाठी अर्ज करू शकतो. फक्त बँकेत दिलेला पत्ता योग्य असला पाहिजे.
6 / 8
SBIच्या ATMद्वारे आपण TDR/STDR या पर्यायावर क्लिक करून 10,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
7 / 8
एसबीआयच्या एटीएमद्वारे आपण बिलाचं पेमेंटही करू शकतो. यासाठी कोणताही कर किंवा जादा रक्कम देण्याची गरज नाही.
8 / 8
SBIच्या डेबिट कार्डने तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर करू शकता. या सेवेसाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही.
टॅग्स :SBIएसबीआय