from atm to pension rules check details about new updates in rules
उद्यापासून 'या' महत्त्वाच्या गोष्टी बदलणार, तुमच्या खिशावर होईल थेट परिणाम! By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 11:40 AM1 / 6उद्यापासून डिसेंबरच्या सुरुवातीसह वर्षाचा शेवट देखील सुरू होणार आहे. 2022 ला निरोप देण्याची वेळ आणि 2023 वर्षाची सुरुवात देखील जवळ येत आहे. या बदलाला अजून काही आठवडे बाकी असले तरी येत्या डिसेंबरच्या सुरुवातीपासून काही बदल लागू होणार आहेत.2 / 6हे बदल तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकतात. ज्यामध्ये एटीएम किंवा पेन्शनमधून पैसे काढण्यापासून गॅसच्या किमतींशी संबंधित कामाचा समावेश आहे. अशा परिस्थितीत, या बदलांवर लक्ष ठेवणे आणि भविष्यासाठी आपल्या योजना बनवणे आपल्यासाठी महत्वाचे आहे.3 / 6गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतींमध्ये बदल करतात. अशा परिस्थितीत उद्याच्या गॅसच्या किमतींवर लक्ष ठेवा.. कदाचित वर्षाच्या शेवटी घरगुती गॅसवर दिलासा मिळू शकतो. नोव्हेंबरमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरवर कपात करण्यात आली होती.4 / 6जर तुम्हाला पेन्शन मिळत असेल, तर लक्षात ठेवा की तुम्हाला आजपर्यंत म्हणजे नोव्हेंबर अखेरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची संधी आहे. जीवन प्रमाणपत्र सादर करणे आता खूप सोपे झाले आहे, तुम्ही निवडलेल्या बँकांच्या डोअर स्टेप सुविधेचा देखील लाभ घेऊ शकता.5 / 6जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे खातेदार असाल तर उद्यापासून एटीएममधून पैसे काढताना तुमचा मोबाईल घेऊन जाण्यास विसरू नका, कारण 1 डिसेंबरपासून तुम्हाला पैसे काढण्यासाठी ओटीपी द्यावा लागेल.6 / 6किरकोळ वापरासाठी डिजिटल रुपयाचा पायलट प्रोजेक्टही 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यामध्ये निवडक ठिकाणी ग्राहकांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सामील केले जाईल. आणखी वाचा Subscribe to Notifications