From RBI action to Vijay Shekhar sharma resignation what happened at Paytm Payments Bank in a month
RBI च्या कारवाईपासून विजय शेखर यांच्या राजीनाम्यापर्यंत, महिन्याभरात पेटीएम पेमेंट्स बँकेत काय काय झालं? By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 8:49 AM1 / 10३१ जानेवारी रोजी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेटीएम पेमेंट्स बँके लिमिटेडवर (Paytm Payments Bank Ltd ) वर २९ फेब्रुवारीनंतर नवीन ठेवी आणि क्रेडिट व्यवहार स्वीकारण्यावर बंदीसह प्रमुख व्यावसायिक निर्बंध लादले. नंतर रिझर्व्ह बँकेनं ही मुदत १५ मार्चपर्यंत वाढवली. यासह, विजय शेखर शर्मा यांनी आता पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, गेल्या महिन्याभराच्या कालावधीत काय काय झालं हे जाणून घेऊ.2 / 10३१ जानेवारी - आरबीआयनं पेटीएम पेमेंट्स बँकेला २९ फेब्रुवारी २०२४ नंतर ठेवी स्वीकारणं थांबवावं आणि ग्राहकांची खाती, प्रीपेड उपकरणं, वॉलेट्स, फास्टॅग, एनसीएमसी कार्ड इत्यादींमध्ये क्रेडिट व्यवहार किंवा टॉपअप थांबवण्यास सांगितलं.3 / 10१ फेब्रुवारी - गुंतवणूकदारांच्या कॉन्फरन्स कॉलमध्ये, कंपनी व्यवस्थापनानं त्यांच्या कर्जदार भागीदारांनी आरबीआयच्या अधिसूचनेवर स्पष्टतेची विनंती केली असल्याचं म्हटलं. कर्जदारांशी त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी चर्चा करत असल्याचं त्यांनी म्हटलं. पेटीएमकडे सुमारे ११ बँकिंग आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) भागीदार आहेत, जे त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे कर्जाची सुविधा देतात.4 / 10४ फेब्रुवारी - कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं (CAIT) ईंट-आणि-मोर्टार व्यवसायांना पेटीएम वरून इतर पेमेंट अॅप्लिकेशन्सवर स्विच करण्यास सांगितलं.5 / 10८ फेब्रुवारी - पतधोरण समितीच्या पत्रकार परिषदेदरम्यान, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, नियामकाचे सर्व निर्णय प्रणालीगत स्थिरता सुनिश्चित करण्याच्या आणि ठेवीदार, तसंच ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी घेण्यात आलेल्या आहेत.6 / 10९ फेब्रुवारी - One97 Communications Ltd च्या बोर्डाने Paytm Payments Bank Ltd ला अनुपालन आणि नियमनाबाबत सल्ला देण्यासाठी बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष एन दामोदरन यांच्या अध्यक्षतेखाली एक पॅनेल तयार केलं.7 / 10१२ आणि १४ फेब्रुवारी - आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रिझर्व्ह बँक पेटीएम पेमेंट्स बँकेवर केलेल्या कारवाईचा आढावा घेणार नसल्याचं म्हटलं. वन97 कम्युनिकेशन्सनं एक्सचेंजेसला जारी केलेल्या स्पष्टीकरणात म्हटलंय की सक्तवसूली संचालनालयानं काही कागदपत्रं योग्य वेळेत मागितली आहेत, जी कंपनीनं सोपवली आहेत. फेमाचं उल्लंघन केल्याबद्दल सक्तवसूली संचालनालयानं कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याच्या मीडियाच्या वृत्तानंतर कंपनीनं हे स्पष्टीकरण जारी केलं.8 / 10१६ फेब्रुवारी - RBI ने पेटीएम समस्येवर FAQ जारी केले आणि Paytm Payments Bank Ltd साठी नवीन ठेवी आणि क्रेडिट व्यवहार स्वीकारणं थांबवण्याची अंतिम मुदत २९ फेब्रुवारी ते १५ मार्च पर्यंत वाढवली.9 / 10२३ फेब्रुवारी - आरबीआयच्या म्हणण्यानुसार त्यांनी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला (NPCI) Paytm UPI ॲप ऑपरेशन्स सुलभ करण्यासाठी युपीआय चॅनेलसाठी थर्ड-पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर (TPAP) बनण्यासाठी One97 Communication Limited ची विनंती तपासण्याचा सल्ला दिला आहे. 10 / 10२६ फेब्रुवारी - बोर्डाची पुनर्रचना सक्षम करण्यासाठी विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला. चेअरमनच्या नियुक्तीसाठी प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचं पीपीबीएलनं सांगितल्याचं One 97 Communications नं सांगितलं. आणखी वाचा Subscribe to Notifications