Fuel price hike erupts! Not only travel, living is expensive; How to make 23% fuel more expensive?
इंधन दरवाढीचा भडका! केवळ प्रवास नव्हे, जगणंही महाग; २३% इंधन महाग सोसणार कसे? By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 7:38 AM1 / 10‘पीपली लाइव्ह’ या चित्रपटात ‘महंगाई डायन खाए जात है...’ हे महागाईवरचं गाणं आहे. ते आज परिस्थितीतही तितकंच तंतोतंत लागू पडते. सत्तेत कोणीही असो महागाईच्या भस्मासुराला आवरण्यात फारसं कोणाला यश आलेलं नाहीच. 2 / 10आताही इंधनाच्या वाढत्या दरांचा फटका सामान्यांना सहन करावा लागत आहे. अगदी गाड्यांच्या वाहतुकीपासून ते घराच्या किरणा मालापर्यंत सर्वच क्षेत्रांवर दरवाढीचा परिणाम जाणवून येत आहे...3 / 10नवीन प्रवासी वाहनांची (कार) निर्मिती केली की डीलर्सपर्यंत डिलिव्हरी करण्याच्या वाहतुकीचा खर्च वाढला आहे. या खर्चाची वसुली ग्राहकांकडून करून घेण्याकडे कारनिर्मात्यांचा कल दिसतो.4 / 10एमजी हेक्टर या कारनिर्मिती कंपनीने आपल्या गाड्यांच्या किमती वाढविण्याचे सूतोवाच केले आहे, इतर वाढवण्याची शक्यता आहे. १० ते १२% एवढा वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता आहे. एरव्ही वाहतुकीचा खर्च २ ते २.५ टक्के असतो.5 / 10कोरोनाच्या उगमापासून आतापर्यंत इंधनाच्या दरांत तब्बल ६५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रक वाहतुकीचा खर्च वाढला आहे, ट्रक वाहतुकीत ४० टक्के खर्च इंधनावरच होतो.6 / 10सर्वाधिक मालवाहतूक रस्ते मार्गे होते. त्यातही डिझेलवर चालणारे ट्रक असतात. इंधन दरवाढीमुळे मालवाहतुकीवर परिणाम झाला आहे. कच्च्या मालाच्या वाहतुकीचा खर्च वाढणार असल्याने अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या अंतिम उत्पादनाचा खर्च वाढणे अपेक्षित आहे. त्यामुळे त्याचा बोजा ग्राहकांवरच पडू शकतो.7 / 10ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्यांनी पार्टनर्सच्या पेमेंट स्ट्रक्चरमध्ये बदल करण्याचे ठरवले आहे. अखेरीस ग्राहकांना ऑनलाईन फुड डिलिव्हरी पूर्वीपेक्षा महाग पडू शकते.8 / 10२३ टक्क्यांनी वाढल्याने लॉजिस्टिक्सचा खर्च वाढला. सुरुवातीला हा खर्च सहन करण्याची ताकद उद्योगांमध्ये होती. आता त्यांचाही नाईलाज झाला आहे.9 / 10मध्यमवर्गाच्या भाजीपाला, किराणा मालावरील खर्चात वाढ होणे अपेक्षित आहे. इंधनाच्या दरांना आवर घातला नाही तर मध्यमवर्गाचे आर्थिक गणित कोलमडू शकते.10 / 10विमानासाठी लागणाऱ्या इंधनातही (एटीएफ) सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे देशांतर्गत विमान प्रवास महागण्याची शक्यता आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications