शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

₹१००० ची गुंतवणूक जमवेल ₹८,२४,६४१ चा फंड; Post Office ची ही स्कीम करेल तुम्हाला मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 9:02 AM

1 / 7
सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करताना सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचे (Public Provident Fund- PPF) नाव नक्कीच येतं. पोस्ट ऑफिसच्या (Post Office Schemes) लोकप्रिय योजनांपैकी ही एक योजना आहे. या सरकारी हमी योजनेत कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. पीपीएफ योजना १५ वर्षांत मॅच्युअर होते. तसंच यात टॅक्स बेनिफिट्सही मिळतात.
2 / 7
दीर्घकालीन गुंतवणुकीच्या माध्यमातून आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी मोठी रक्कम जमा करायची असेल तर ही योजना एक चांगला पर्याय ठरू शकते. सध्या या योजनेवर ७.१ टक्के दरानं व्याज दिलं जातंय. जर तुम्ही दर महिन्याला या योजनेत मुलांच्या नावावर १००० रुपये जमा करत असाल तर त्यांच्यासाठी तुम्ही ८ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जोडू शकता. त्यासाठी काय करावं लागेल हे समजून घेऊ.
3 / 7
जर तुम्ही या योजनेत दरमहा १,००० रुपये गुंतवले तर तुम्ही एका वर्षात १२,००० रुपयांची गुंतवणूक कराल. ही योजना १५ वर्षांनंतर मॅच्युअर होईल, परंतु आपल्याला ५-५ वर्षांच्या ब्लॉकमध्ये दोनवेळा ती वाढवावी लागेल आणि सलग २५ वर्षे गुंतवणूक सुरू ठेवावी लागेल.
4 / 7
जर तुम्ही २५ वर्षांसाठी दरमहा १,००० रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्ही एकूण ३,००,००० रुपयांची गुंतवणूक कराल. परंतु ७.१ टक्के व्याजानुसार तुम्ही फक्त व्याजातून ५,२४,६४१ रुपये मिळवाल आणि तुमची मॅच्युरिटी रक्कम ८,२४,६४१ रुपये असेल.
5 / 7
पीपीएफ खात्याची मुदतवाढ ५-५ वर्षांच्या कालावधीमध्ये दिली जाते. पीपीएफ एक्सटेन्शनच्या बाबतीत गुंतवणूकदाराकडे दोन प्रकारचे पर्याय असतात - पहिला, योगदानासह खात्याचं एक्स्टेन्शन आणि दुसरा, गुंतवणुकीशिवाय खात्याचं एक्स्टेन्शन. तुम्हाला योगदानासह खात्याची मुदतवाढ करावी लागेल. यासाठी तुमचं खातं कुठेही असेल तर बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज द्यावा लागेल.
6 / 7
लक्षात ठेवा की मॅच्युरिटीच्या तारखेपासून १ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी हा अर्ज द्यावा लागेल आणि मुदतवाढीसाठी फॉर्म भरावा लागेल. ज्या पोस्ट ऑफिस/बँकेच्या शाखेत पीपीएफ खातं उघडण्यात आलंय, त्याच पोस्ट ऑफिस/बँकेच्या शाखेत फॉर्म जमा केला जाईल. जर तुम्ही हा फॉर्म वेळेत सबमिट करू शकला नाही तर तुम्ही खात्यात योगदान देऊ शकणार नाही.
7 / 7
पीपीएफ ही ईईई श्रेणीची योजना आहे, त्यामुळे या योजनेत तुम्हाला ३ प्रकारे करसवलत मिळणार आहे. EEE चा अर्थ म्हणजे Exempt Exempt Exempt. या कॅटेगरीत येणाऱ्या योजनेत वार्षिक जमा होणाऱ्या रकमेवर कर आकारला जात नाही, याशिवाय दरवर्षी मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जात नाही आणि मॅच्युरिटीच्या वेळी मिळणारी संपूर्ण रक्कमही करमुक्त असते. म्हणजेच गुंतवणूक, व्याज/परतावा आणि मॅच्युरिटीमध्ये कराची बचत होते.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूकMONEYपैसा