शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

15 दिवसांत 100 रुपयांनी महागलं सिलेंडर, पण सबसिडी तेवढीच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 4:33 PM

1 / 10
विना अनुदानित घरगुती सिलिंडरची किंमत वाढविल्यानंतर सबसिडी वाढते, असा ग्राहकांचा नेहमीचा अनुभव आहे. पण डिसेंबर महिन्यात १०० रुपये दरवाढ केल्यानंतरही ग्राहकांच्या बँक खात्यात नोव्हेंबरएवढीच सबसिडी जमा होत आहे.
2 / 10
घरगुती सिलेंडरच्या किंमतीत गेल्या 15 दिवसांत 100 रुपयांची वाढ झाली आहे, पण ग्राहकांच्या खात्यात केवळ 40.10 रुपयेच जमात होत आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम असून तेल कंपन्यांचा अजब न्याय असल्याचे सांगत दाद कुणाकडे मागावी, अशी सवाल उपस्थित करीत आहेत.
3 / 10
सिलेंडरच्या वाढीव किमतीनुसार १४० रुपये सबसिडी बँक खात्यात जमा व्हायला हवी, हे विशेष.
4 / 10
नोव्हेंबरमध्ये विनाअनुदानित घरगुती सिलिंडरची किंमत 646 रुपये होती. तेव्हा बँक खात्यात 40.10 रुपये सबसिडी जमा व्हायची. त्यानंतर 2 डिसेंबरला सिलिंडरचे दर 50 रुपयांनी वाढून 696 रुपयांवर गेले.
5 / 10
तेव्हाही ग्राहकांच्या बँक खात्यात 40.10 रुपये सबसिडी जमा झाली. त्यानंतर 15 डिसेंबरला सिलिंडर पुन्हा 50 रुपयांनी दर वाढले आणि किंमत 746 रुपयांवर पोहोचली.
6 / 10
त्यानंतर 40.10 रुपये सबसिडी बँक खात्यात जमा झाल्याचे मॅसेज ग्राहकांना येत आहेत. अर्थात सिलिंडरचे दर 646 रुपये असताना 40.10 रुपये सबसिडी, 696 रुपयावर गेल्यावरही तेवढीच आणि 746 रुपये झाल्यावरही 40.10 रुपये सबसिडी जमा होत असल्याने ग्राहक संभ्रमात आहेत.
7 / 10
सिलिंडरचे दर वाढल्यानंतर सबसिडी वाढीव किमतीच्या प्रमाणात जमा होत असल्याचा ग्राहकांचा नेहमीचा अनुभव आहे. पण जास्त सबसिडी का जमा होत नाही, हा गंभीर प्रश्न आहे.
8 / 10
नाव न सांगण्याच्या अटीवर कंपनीचे अधिकारी म्हणाले, केवायसीच्या अटी पूर्ण केलेल्या ग्राहकांच्या बँक खात्यात तेल कंपन्यांच्या अटीनुसार सबसिडी जमा होते. सिलिंडरच्या किमतीनुसार सबसिडी कमी-जास्त होत असते. डिसेंबरमध्ये दोनदा किमती वाढूनही सबसिडी का वाढली नाही, यावर भाष्य करता येणार नाही. हे सर्वस्वी तेल कंपन्यांच्या हातात आहे.
9 / 10
ज्यांना कमी सबसिडी जमा झाल्याचे मॅसेज आले, त्यांच्या खात्यात पुन्हा सबसिडी जमा होऊ शकते.
10 / 10
विनाअनुदानित सिलिंडरची १०० रुपये दरवाढ केल्यानंतरही बँक खात्यात नोव्हेंबरच्या किमतीएवढीच ४०.१० रुपये सबसिडी जमा होत आहे. केंद्र सरकार वाढीव दराचा ग्राहकांना फायदा न देता त्यांच्या खिशातून १०० रुपये जास्तीचे काढत आहे. हे चुकीचे आहे. सरकारने सबसिडी वाढवावी आणि ग्राहकांना न्याय द्यावा.
टॅग्स :delhiदिल्लीMumbaiमुंबईconsumerग्राहक