शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

IIT-IIM ची डिग्री नाही, यानं युट्युब व्हिडीओ तयार करून उभी केली २५००० कोटींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 10:23 AM

1 / 11
आजकाल यूट्यूब व्हिडिओ, रील्स बनवण्याची क्रेझ सातत्यानं वाढत आहे. घरात असो की बाहेर, बाजारात असो किंवा शाळेत, हातात स्मार्टफोन घेऊन लोक अनेकदा तिकडे व्हिडिओ बनवताना दिसतील. सोशल मीडियावर लाइक्स, सबस्क्राइबच्या या खेळात तरुण पिढी चांगलीच अडकली आहे.
2 / 11
पण प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात असं म्हणतात. त्याचप्रमाणे याचीही दुसरी बाजू आहे. काही लोक सोशल मीडियावर व्हिडीओ तयार करून प्रसिद्धी मिळवतात. तर काही लोक त्यात अडकून त्यांचे करिअर उद्ध्वस्तही करतात.
3 / 11
आज आम्ही अशाच एका व्यक्तीची गोष्ट सांगत आहोत, ज्यानं यूट्यूब व्हिडीओ तयार करुन २५ हजार कोटींची कंपनी बनवली. त्याच्याकडे आयआयटी पदवी किंवा आयआयएमचा अनुभव नाही. एका सामान्य इंजिनियरनं या व्हिडीओंच्या माध्यमातून कोट्यवधींची कंपनी उभारली.
4 / 11
ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म Unacademy ही जगातील सर्वात मोठ्या एड्युटेक कंपन्यांपैकी एक आहे. पण या कंपनीची सुरुवात यूट्यूब चॅनलनं झाली हे फार कमी लोकांना माहिती आहे. गौरव मुंजाल यांनी २०१० मध्ये त्यांचं यूट्यूब चॅनल सुरू केलं. या यूट्यूब चॅनेलनं नंतर अनॅकॅडमी कंपनीचं रूप घेतलं.
5 / 11
गौरव मुंजाल यांनी १२ वर्षांचे असताना कोडिंग शिकायला सुरुवात केली. कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांनी त्याचे व्हिडीओ यूट्यूब चॅनलवर टाकायला सुरुवात केली. त्यांनी लोकांना व्हिडीओच्या माध्यमातून ग्राफिक्स बनवायला शिकवलं. या यूट्यूब चॅनलनं एका मोठ्या कंपनीचा पाया रचला. आज गौरव मुंजाल त्याच कंपनीचे सीईओ आहेत.
6 / 11
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर गौरव यांनी बी.टेकचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी एनएमआयएमएस विद्यापीठात प्रवेश घेतला. अभ्यासानंतर उरलेल्या वेळात व्हिडीओ तयार करुन तो आपल्या युट्युब चॅनलवर ते अपलोड करायचे. त्याच्या यूट्यूब चॅनेलचं नाव गौरव मुंजाल असंच होतं. याचं नाव नंतर बदलून Unacademy करण्यात आलं.
7 / 11
खरंतर गौरवला नेहमीच व्यवसाय करायचा होता. B.Tech पूर्ण केल्यानंतर त्यांनी Flatchat ची सुरुवात केली. यानंतर त्यांनी डायरेक्टी जॉईन केले. कामासोबतच त्यांनू आपल्या यूट्युब चॅनलवर अभ्यासाशी संबंधित व्हिडीओ टाकणं मात्र सोडलं नाही.
8 / 11
कॉलेजच्या दिवसात त्यांची डॉ. रोमन सैनी आणि हिमेश सिंग यांची भेट झाली. तिघेही मित्र होते. एक दिवस चर्चेदरम्यान गौरवनं व्यवसाय सुरू करण्याविषयी सांगितलं. २०१४ साली तिघांनी मिळून स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे व्हिडीओ युट्युब चॅनलवर अपलोड करायला सुरुवात केली. त्यावेळी त्याच्या यूट्यूब चॅनेलचे २४,००० सबस्क्रायबर्स होते.
9 / 11
2015 मध्ये, त्यांनी नोकरी सोडली आणि या युट्युब चॅनेलवर आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित केलं. लोकांना ते व्हिडीओ खूप आवडू लागले. चॅनलचे सबस्क्रायबर्स वाढू लागले. त्यानंतर, १० डिसेंबर २०१५ रोजी, गौरव आणि रोमन यांनी मिळून एक कंपनी म्हणून त्यांचे यूट्यूब चॅनल Unacademy सुरू केले.
10 / 11
नंतर तिघेही आपला पूर्ण वेळ कंपनीला देऊ लागले. आज हजारो तज्ज्ञ आणि लाखो विद्यार्थी अनअॅकेडमीशी जोडलेले आहेत. Unacademy च्या युट्युब चॅनल आणि मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे ट्यूटोरियल व्हिडिओ तयार आणि अपलोड केले जातात.
11 / 11
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग क्लासेस दिले जातात. या कंपनीत अनेक बड्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूकही केलीये. Sequoia Capital India, नेक्सस व्हेन्चर्स, सैफ पार्टनर्स आणि Blume व्हेन्चर्स हे त्यातील गुंतवणूकदार आहेत. २०२२ मध्ये, कंपनीचं नेटवर्थ ३.४ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे २५ हजार कोटी रुपये होतं..
टॅग्स :businessव्यवसायYouTubeयु ट्यूबMONEYपैसा