शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gautam Adani : अदानी समूहाच्या शेअर्सनं पकडला स्पीड, ८ फेब्रुवारीनंतर वाढलं मार्केट कॅप; गुंतवणूकदारही खूश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 11:23 AM

1 / 7
हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्ट समोर आल्यानंतर अडचणीत असलेल्या अदानी समूहाला प्रथमच दिलासा मिळाला आहे. अदानी समूहासाठी मंगळवारचा दिवस चांगला ठरला. आतापर्यंत दररोज घसरणीचा सामना करणाऱ्या अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. अदानी समूहाच्या १० पैकी आठ सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली.
2 / 7
समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा (Adani Enterprises) शेअर १४.२२ टक्क्यांनी वाढून १,३६४.०५ रुपयांवर बंद झाला. अदानी पोर्ट्स आणि एसईझेड (APSEZ) चे शेअर्स ५.४४ टक्क्यांनी वधारले. अदानी ग्रीन एनर्जी (Adani Green Energy) आणि अदानी विल्मर (Adani Wilmar) यांच्या शेअरच्या किंमतीतही प्रत्येकी पाच टक्क्यांनी वाढ झाली.
3 / 7
अदानी समूहाच्या १० पैकी आठ समभागांनी एक महिन्यापेक्षा जास्त घसरणीनंतर अदानी एंटरप्रायझेसने १४ टक्क्यांपेक्षा जास्त तेजीसह मजबूत रिकव्हरी केली आहे. अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशन या दोनच कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली होती.
4 / 7
बीएसईच्या आकडेवारीनुसार मंगळवारच्या तेजीमुळे अदानी समूहाच्या एकत्रित बाजार भांडवलात ३० हजार कोटी रुपयांची भर पडली आहे. ८ फेब्रुवारी २०२३ नंतर ही पहिलीच वेळ होती. कामकाजाच्या अखेरच्या टप्प्यात समूहाचे एकूण बाजार भांडवल ७.१ लाख कोटी रुपये होते.
5 / 7
अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यापासून अदानी समूहाचे शेअर्स दररोज वेगाने घसरत आहेत. अदानी समुहाने हिंडेनबर्गचे आरोप फेटाळले असले तरी शेअर्स अजूनही घसरतच होते. पॉइंट-टू-पॉइंट आधारावर, बाजार मूल्यातील एकूण तोटा १२.१ लाख कोटी रुपये आहे, जे सुमारे १४६ बिलियन डॉलर्स आहे.
6 / 7
रॉयटर्सच्या अहवालानुसार, अदानी समूह आपल्या क्रेडिट प्रोफाइलमध्ये सुधारणा करण्यासाठी शेअर्स तारण ठेवून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याचा विचार करत आहे. कंपनी मार्चपर्यंत सुमारे ६,५०० कोटी रुपयांचे कर्ज फेडू शकते. या अहवालामुळे अदानी समूहाची समस्या कमी झाली आहे.
7 / 7
रॉयटर्सच्या अहवालानुसार, अदानी समूह आपल्या क्रेडिट प्रोफाइलमध्ये सुधारणा करण्यासाठी शेअर्स तारण ठेवून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याचा विचार करत आहे. कंपनी मार्चपर्यंत सुमारे ६,५०० कोटी रुपयांचे कर्ज फेडू शकते. या अहवालामुळे अदानी समूहाची समस्या कमी झाली आहे.
टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीshare marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक