शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वाढता वाढता वाढे..! 'या' दोन कंपन्यांमध्ये अदानी हिस्सा खरेदी करणार, 31 हजार कोटींना होणार डील?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 8:00 PM

1 / 8
अडानी ग्रुपचे सर्वेसर्वा गौतम अदानी (Adani Group Gautam Adani) आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून, ते जगातील श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत टॉप-5मध्ये आले आहेत. एक-एक करत ते अनेक क्षेत्रामध्ये आपला हात आजमावत आहेत. आता मिळालेल्या माहितीनुसार, गौतम अदानी स्विस-बेस्ड फर्म होल्सिम (Holcim) च्या दोन भारतीय कंपन्या एसीसी (ACC) आणि अंबुजा सिमेंट्स (Ambuja Cements) मध्ये 26 टक्के हिस्सेदारी विकत घेणार आहेत.
2 / 8
अदानी समुहाकडून पुढील आठवड्यात हिस्सेदारी विकत घेण्यासाठी खुली ऑफर दिली जाऊ शकते. यासाठी सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. ही खुली ऑफर 26 ऑगस्टपासून सुरू होईल आणि 9 सप्टेंबर रोजी संपेल. ही ऑफर अदानी ग्रुपच्या हाती लागल्यास, त्यांना ओपन ऑफर अंतर्गत होल्सिम ग्रुपला 31,000 कोटी रुपये द्यावे लागतील.
3 / 8
अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी या दोन्ही कंपन्यांनी स्टॉक एक्स्चेंजवर ओपन ऑफरचे पत्र दाखल केले आहे. नियामक फाइलिंगनुसार, ACC Ltd च्या अधिग्रहणासाठी 2,300 रुपये प्रति शेअरची खुली ऑफर देण्यात आली आहे. यात ACC मधील 26 टक्के स्टेक दिले जातील. तर, अंबुजा सिमेंट्स लिमिटेडचे ​​26 टक्के शेअर्स खरेदी करण्यासाठी 385 रुपये प्रति शेअरची खुली ऑफर असेल.
4 / 8
होल्सिम ग्रुपची कंपनी, होल्डरिंडकडे अंबुजा सिमेंटमध्ये 63.19% आणि ACC मध्ये 54.53% हिस्सा आहे. ACC सिमेंटमधील त्यांच्या 54.53% स्टेकपैकी 50.05% स्टेक अंबुजा सिमेंट मार्फत विकत घेतला होता. कंपनीने या वर्षी मे महिन्यात या सिमेंट कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी विकण्याची घोषणा केली होती. होलसिम ग्रुपसोबत झालेल्या डीलनंतर अदानी ग्रुपला ओपन ऑफर आणणे आवश्यक होते.
5 / 8
खुली ऑफर महत्त्वाची का आहे? नियमांनुसार, भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कोणत्याही कंपनीचे 25 टक्के किंवा त्याहून अधिक शेअर्स खरेदी करण्यासाठी खुली ऑफर देणे बंधनकारक आहे. ओपन ऑफर यासाटी आणली जाते, जेणेकरून कंपनीचे लहान शेअर होल्डर्स त्यांचे शेअर्स पूर्वनिर्धारित किंमतीला गुंतवणूकदारांना विकू शकतील.
6 / 8
फाइलिंगनुसार, ACC सिमेंटसाठी सुमारे 11,259.97 कोटी रुपयांची रोख ऑफर केली जाईल. तर, अदानी समूह अंबुजा सिमेंटसाठी 19,879.57 कोटी रुपयांची खुली ऑफर सादर करेल. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, ओपन ऑफर 26 ऑगस्टपासून सुरू होईल आणि 9 सप्टेंबर 2022 रोजी संपेल. अदानी समुहाने मे महिन्यात $10.5 अब्ज किमतीच्या करारात Holcim's India व्यवसाय ताब्यात घेण्याची घोषणा केली होती.
7 / 8
Holcim ग्रुपच्या कंपन्या गेल्या 17 वर्षांपासून भारतात व्यवसाय करत आहेत. कंपनीचे भारतात तीन मोठे ब्रँड आहेत, ज्यात अंबुजा सिमेंट, एसीसी लिमिटेड आणि मायसेम यांचा समावेश आहे. हॉल्सिम ही सध्या अल्ट्राटेक सिमेंट नंतर भारतीय बाजारपेठेतील दुसरी सर्वात मोठी सिमेंट कंपनी आहे. अंबुजा सिमेंट आणि ACC लिमिटेड यांची एकत्रित क्षमता वार्षिक 66 दशलक्ष टन आहे.
8 / 8
अदानी समूहाने या दोन सिमेंट कंपन्या विकत घेतल्यानंतर अदानी भारतासारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत एका झटक्यात नंबर-2 सिमेंट कंपनी बनेल. अंबुजा सिमेंटचे देशात 6 सिमेंट प्लांट आहेत, तर 8 सिमेंट ग्राइंडिंग युनिट आहेत. एकट्या अंबुजा सिमेंटची वार्षिक उत्पादन क्षमता 31 दशलक्ष टन आहे.
टॅग्स :Adaniअदानीbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूक