शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अदानी आणि PM मोदींचे जवळचे संबंध; Hindenberg रिपोर्टवर काँग्रेसने केली चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 3:56 PM

1 / 6
हिंडनबर्गने (Hindenburg Report) गौतम अदानी यांच्या कंपन्यांबाबत दिलेल्या रिपोर्टमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादात आता काँग्रेसने उडी घेतली असून, हिंडनबर्गच्या रिपोर्टचा आरबीआय आणि सेबीमार्फत तपास करण्याची मागणी केली आहे.
2 / 6
काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, 'राजकीय पक्ष एखाद्या खासगी कंपनी किंवा समूहावरील रिपोर्टवर टीका करत नाहीत, पण Hindenburg रिसर्च रिपोर्ट प्रकरणात आम्ही चौकशीची मागणी करत आहोत. याचे कारण म्हणजे, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हापासून अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी आणि मोदींचे जवळचे संबंध आहेत. या आरोपांची आरबीआय आणि सेबीने गांभीर्याने चौकशी करावी, कारण भारतीय आर्थव्यवस्थेच्या स्थिरतेचा आणि सुरक्षितते प्रश्न आहे.
3 / 6
अमेरिकन इन्व्हेस्टमेंट रिसर्चने अदानी समूहावर कॉर्पोरेट जगतातील सर्वात मोठी फसवणूकीचा आरोप केला आहे. रिपोर्टमध्ये अदानी समूहावर शेअर्समध्ये फेरफार आणि अकाउंटिंग फ्रॉडचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, हे आरोप निराधार असल्याचे सांगत अदानी समूहाने कायदेशीर कारवाई करण्याचा विचार केला आहे.
4 / 6
रिसर्च फर्मने दिले आव्हान- आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन जारी केलेल्या निवेदनात हिंडेनबर्गने म्हटले की, जर अदानी समूहाने अमेरिकन न्यायालयात या अहवालाविरुद्ध खटला दाखल केला तर संशोधन संस्था कागदपत्रांची मागणी करेल. अदानी समूह गंभीर असेल, तरच त्यांनी अमेरिकेत खटला दाखल करावा.
5 / 6
आमच्याकडे कायदेशीर शोध प्रक्रियेतील कागदपत्रांची एक लांबलचक यादी आहे. आम्ही आमच्या रिपोर्टवर पूर्णपणे ठाम आहोत. आमच्याविरुद्ध कोणतीही कारवाई व्यर्थ ठरेल. हिंडनबर्ग रिसर्चने आपल्या वेबसाइटवर म्हटले की, कंपनी फॉरेन्सिक आर्थिक संशोधनात माहिर आहे. रिसर्च फर्मला इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह विश्लेषकांवर ऐतिहासिक संशोधनासह गुंतवणूक व्यवस्थापन उद्योगांमध्ये दशकांचा अनुभव आहे.
6 / 6
अदानी समुहाचे शेअर्स आज 20% ने घसरले- या रिपोर्टचे पडसाद शेअर बाजारावर उमटत आहेत. अदानी समुहाच्या जवळपास सर्वच शेअरेसमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळत. कंपनीचे शेअर्स 20% पर्यंत घसरले असून, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट, अदानी विल्मार या कंपन्यांना तोटा झाला आहे.
टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीNarendra Modiनरेंद्र मोदीbusinessव्यवसाय