शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गौतम अदानींनी कमावले ५,४१,४५,३२,५०,००० रुपये, एका झटक्यात बनले आशियातील दुसरे श्रीमंत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 8:46 AM

1 / 9
मंगळवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. यामुळे समूहाच्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात १.२ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची संपत्ती ६.५ अब्ज डॉलर्सनं वाढली.
2 / 9
२४ जानेवारी रोजी हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्ट समोर आल्यानंतर एका दिवसात अदानींच्या एकूण संपत्तीत झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, यासह अदानीची एकूण संपत्ती ६६.७ अब्ज डॉलर्सवर पोहोचली. यासह, ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १९ व्या स्थानावर पोहोचले आहेत.
3 / 9
आशियातील श्रीमंतांच्या यादीत ते रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मंगळवारी सर्वाधिक कमाईच्या बाबतीत अदानी टेस्लाचे इलॉन मस्क यांच्यानंतर दुसऱ्या स्थानावर आहेत.
4 / 9
अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या टिप्पणीमुळे मंगळवारी अदानी समूहाचे शेअर्स वधारले. अदानी टोटल गॅसचे शेअर्स सर्वाधिक २० टक्क्यांनी वाढले. अदानी पॉवरनेही ५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरापर्यंत मजल मारली.
5 / 9
अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चनं २४ जानेवारी रोजी अदानी समूहाविरोधात अहवाल प्रसिद्ध केला होता. यामध्ये शेअरच्या किमतीत फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता.
6 / 9
समूहानं हे आरोप फेटाळले असले तरी, यामुळे त्याच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. त्यामुळे अदानींच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आणि ते जगातील सर्वात श्रीमंत टॉप २० व्यक्तींच्या यादीतून बाहेर गेले. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती ५३.८ अब्ज डॉलरनं घसरली आहे.
7 / 9
दरम्यान, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या संपत्तीत मंगळवारी ७.६१ अब्ज डॉलर्सची वाढ झाली. मस्क यांची एकूण संपत्ती आता २२८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती ९०.८ अब्ज डॉलर्सनं वाढली आहे. या वर्षी ते सर्वाधिक कमाईच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहेत.
8 / 9
Amazon चे संस्थापक जेफ बेझोस या यादीत १७१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. १६७ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत.
9 / 9
जगातील श्रीमंतांच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (१३४ अब्ज डॉलर्स) चौथ्या, स्टीव्ह बाल्मर (१३२ अब्ज डॉलर्स) पाचव्या, लॅरी एलिसन (१३१ अब्ज डॉलर्स) सहाव्या, लॅरी पेज (१२४ अब्ज डॉलर्स) सातव्या, मार्क झुकेरबर्ग (१२३ अब्ज डॉलर्स) आठव्या स्थानावर, वॉरेन बफे (१२१ अब्ज डॉलर्स) नवव्या स्थानावर आणि सेर्गे ब्रिन (११७ अब्ज डॉलर्स) दहाव्या स्थानावर आहेत. टॉप १० मधील नऊ जण अमेरिकेतील आहेत. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी ८९.९ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह १३ व्या क्रमांकावर आहेत.
टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीAdaniअदानीMukesh Ambaniमुकेश अंबानी