शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gautam Adani : अदानींच्या नावे मोठी कामगिरी, वर्षभरात मालमत्तेत सर्वाधिक वाढ; आठवड्याला 6,000 कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 12:12 PM

1 / 9
Gautam Adani Networth: अदानी समूहाचे (Adani Group) मालक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत गेल्या वर्षभरात मोठी वाढ झाली आहे. गौतम अदानी यांच्या संपत्तीत एका वर्षात ४९ अब्ज डॉलरची वाढ झाली.
2 / 9
बुधवारी जाहीर झालेल्या 2022 च्या हुरुन ग्लोबल रिच लिस्टनुसार, अदानी समूहाच्या अध्यक्षांनी गेल्या एका वर्षात दर आठवड्याला सुमारे 6,000 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
3 / 9
हुरुन इंडियाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या मालमत्तेत गेल्या एका वर्षात 153 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2022 च्या M3M हुरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये गौतम अदानी सर्वात श्रीमंत उद्योगपती ठरले आहेत.
4 / 9
त्याच वेळी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Reliance Industries Limited) ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे 2022 M3M हुरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये 103 अब्ज डॉलर्स संपत्तीसह टॉप 10 मध्ये प्रवेश करणारे एकमेव भारतीय आहेत. गेल्या एका वर्षात अंबानींच्या संपत्तीत 24 टक्क्यांची वाढ झाली आहे.
5 / 9
M3M हुरुन ग्लोबल लिस्ट 2022 मध्ये गौतम अदानी हे प्रथम क्रमांकावर आहेत. तसंच गेल्या वर्षी त्यांची संपत्ती 49 अब्ज डॉलर्सने वाढल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे. रिन्युएबल एनर्जी कंपनी अदानी ग्रीनच्या लिस्टिंगनंतर गौतम अदानींनी संपत्ती २०२० मध्ये 17 बिलियन डॉलर्सवरून जवळपास पाच टक्क्यांनी वाढून 81 बिलियन डॉलर्स झाली.
6 / 9
नायकाच्या संस्थापक फाल्गुनी नायर (Nykaa Falguni Nayar) यांनी देखील हुरुन ग्लोबल रिट लिस्ट 2022 मध्ये आपलं स्थान तयार केलं आहे. त्यांच्या संपत्तीत एकूण 7.6 बिलियन डॉलर्सची वाढ झाली आहे.
7 / 9
त्याच वेळी, सायरस पूनावाला ग्रुपचे सायरस एस पूनावाला यांच्या संपत्तीत 41 टक्क्यांची वाढ होऊन ती 26 अब्ज डॉलर्स झाली आहे. पूनावाला यांनी गेल्या 10 वर्षांत 500 हून अधिक रँक मिळवलं आहे.
8 / 9
या यादीनुसार, अदानी हे जगातील सर्वाधिक संपत्ती मिळविणाऱ्यांपैकी एक म्हणून पुढे आले आहेत. तर रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध आणि कोरोनाचा अद्यापही असलेला प्रभाव अशा परिस्थितीतही गेल्या एका वर्षात जगभरातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती 4 टक्क्यांनी वाढून 15.2 ट्रिलियन झाल्याचं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेय.
9 / 9
तसंच रिपोर्टनुसार भारत आपल्या 215 अब्जाधीश आणि 58 नव्या उद्योजकांसह जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा अब्जाधीश बनणारा देश झालाय. भारतीय वंशाच्या अब्जाधीशांची संख्या यात जोडली तर ती संख्या 246 होईल. चीन मध्ये भारताच्या पाचपट म्हणजे सर्वाधिक 1133 अब्जाधीश आहेत. तर अमेरिकेत अब्जाधीशांची संख्या 716 इतकी आहे.
टॅग्स :AdaniअदानीRelianceरिलायन्सMukesh Ambaniमुकेश अंबानीIndiaभारत