gautam adani green energy ltd completed the acquisition of sb energy india with 3 5 billion
Adani चा दबदबा कायम! उर्जा क्षेत्रातील बडी कंपनी केली खरेदी; तब्बल ३.५ अब्ज डॉलर मोजले By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 4:11 PM1 / 10अलीकडेच मिळालेल्या एका माहितीनुसार, गौतम अदानी (Gautam Adani) यांनी दर दिवसाला तब्बल १,००२ कोटी रुपयांची कमाई केली असून, एकूण संपत्ती ५,०५,९०० कोटींच्या घरात पोहोचली आहे. याआधीच्या वर्षात हा आकडा १,४०,२०० कोटी इतका होता.2 / 10Adani यांनी विक्रमी झेप घेत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चीनचे सुप्रसिद्ध बाटलीबंद पाण्याचे उद्योजक झोंग शानशान यांना मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. आशियातील सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानावर रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी असले तरी गेल्या वर्षभरात त्यांच्या संपत्तीत केवळ ९ टक्के वाढ झाली आहे. 3 / 10यातच आता हरित ऊर्जा (ग्रीन एनर्जी) क्षेत्रात गौतम अदानी यांनी मोठी खेळी केली असून, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने एसबी एनर्जी होल्डिंग्स लिमिटेड (SB Energy India) खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. ३.५ अब्ज डॉलर म्हणजेच २६ हजार कोटी रुपये किंमतीचा हा करार पूर्णपणे रोख स्वरूपात करण्यात आला आहे. 4 / 10या अधिग्रहण प्रक्रियेसाठी दोन्ही कंपन्यांनी १८ मे २०२१ रोजी करार केला होता. भारताच्या अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातला (रिन्युएबल एनर्जी) हा सर्वात मोठा करार असल्याचे सांगितले जात आहे. 5 / 10एसबी एनर्जी इंडिया आता पूर्णपणे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या मालकीची झाली आहे. याआधी सॉफ्टबँक ग्रुप कॉर्प आणि भारती ग्रुपची अनुक्रमे ८० आणि २० टक्के हिस्सेदारी एसबी एनर्जीमध्ये होती. 6 / 10एसबी एनर्जी कॅनेडियन पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड (सीपीपीआयबी) शी बोलणी करत होती, पण मूल्यांकनावरील मतभेदांमुळे ते जमू शकले नाही. यानंतर अदानी ग्रीन एनर्जीशी त्यांची चर्चा तीव्र झाली.7 / 10या करारामुळे आम्ही रिन्यूएबल्स क्षेत्रात जागतिक नेतृत्व बनण्याच्या जवळ आलो आहोत. कार्बनमुक्त भविष्यासाठी आपण किती गंभीर आहोत, हे हा करार सिद्ध करतो. यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये रोजगार निर्माण होईल, असे एजीईएलचे एमडी आणि सीईओ विनीत एस जैन यांनी म्हटले होते. 8 / 10गेल्या आठवड्यात अदानींनी घोषणा केली होती की, त्यांचा गट पुढील १० वर्षांमध्ये अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी २० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करेल. या अधिग्रहणामुळे अदानी ग्रीनच्या क्षमतेमध्ये पाच गीगावॅटची भर पडेल. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये सौर, पवन आणि सौर-पवन या हायब्रिड प्रकल्पांचा समावेश आहे. 9 / 10यापैकी १७०० मेगावॅटचे प्रकल्प कार्यान्वित आहेत, तर उर्वरित प्रकल्पांवर काम चालू आहे. यामुळे एजीईएल (AGEL)चे एकूण पोर्टफोलिओ १९.८ गीगावॅट पर्यंत वाढला आहे. दरम्यान, आशियातील श्रीमंतांपैकी भारतीयांच्या यादीत यंदा पहिल्यांदाच टॉप-१० मध्ये गौतम अदानी यांच्यासह त्यांचा दुबईस्थित भाऊ विनोद शांतिलाल अदानी यांचाही समावेश झाला आहे. 10 / 10गौतम अदानी यांच्या स्थानात दोन स्थानांची बढत होऊन ते दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. तर विनोद अदानी यांच्या स्थानात तब्बल १२ स्थानांची बढत झाली असून ते आठव्या स्थानावर पोहोचले आहेत. विनोद अदानी यांची संपत्ती १,३१,६०० कोटी इतकी असून गेल्या वर्षभरात २१.२ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications