शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gautam Adani : नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी अदानींना झटका; ९८७८ कोटींचा फटका, श्रीमंतांच्या यादीत घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2023 9:17 AM

1 / 9
भारतीय अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासाठी २०२३ ची सुरुवात अत्यंत वाईट ठरली. २४ जानेवारी रोजी अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडनबर्गचा रिपोर्ट समोर आल्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
2 / 9
एका महिन्याच्या आत, अब्जाधीशांच्या यादीत अदानी चौथ्या क्रमांकावरून ३४ व्या स्थानावर घसरले, तर त्यांच्या समूहाचे बाजार भांडवलही १०० अब्ज डॉलरच्या खाली आले. आता १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असून सोमवारचा पहिला कामकाजाचा दिवसही त्यांच्यासाठी तोट्याचा ठरला आहे.
3 / 9
सोमवारी, आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी, गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाच्या सूचीबद्ध १० कंपन्यांपैकी ८ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली. दरम्यान, दोन कंपन्यांच्या शेअर्सना लोअर सर्किटला लागलं.
4 / 9
लोअर सर्किटचा फटका बसलेल्या शेअर्सपैकी एक म्हणजे अदानी ट्रान्समिशन, जो ५ टक्क्यांनी घसरून ९४३.४० रुपयांवर बंद झाला. याशिवाय दुसरा स्टॉक अदानी ग्रीन एनर्जीचा आहे, जो ५ टक्क्यांनी घसरला आणि ८३७.१० रुपयांच्या पातळीवर बंद झाला.
5 / 9
सोमवारी शेअर बाजारातील कामकाजादरम्यान अदानी एन्टरप्रायझेसच्या शेअर १.८५ टक्क्यांनी घसरून १,७१८.०० रुपयांवर, अदानी पॉवर ०.७८ टक्क्यांनी घसरून १९०.१० रुपयांवर, अदानी विल्मर २.३८ टक्क्यांनी घसरून ३९६.२० रुपयांवर बंद झाले.
6 / 9
तर दुसरीकडे अदानी पोर्ट्स ०.४४ टक्क्यांनी घसरुन ६२९.१५, अदानी टोटल गॅस २.२८ टक्क्यांनी घसरून ८४८.०० रुपयांवर आणि न्यू दिल्ली टेलिव्हिजन (NDTV) २.९५ टक्क्यांनी घसरून १८६.०५ रुपयांवर बंद झाला.
7 / 9
या घसरणीच्या मालिकेत, अदानी यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या सिमेंट कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढ झाली. शेअर बाजारातील कामकाजाच्या अखेरच्या टप्प्यात एसीसी लिमिटेडचे ​​शेअर्स २.४३ टक्क्यांच्या वाढीसह १,७०७.७० रुपयांवर बंद झाले. दुसरीकडे, अदानींची सिमेंट क्षेत्रातील दुसरी कंपनी अंबुजा सिमेंट्स लिमिटेडचा शेअर २.६७ टक्क्यांच्या वाढीसह ३७५.३० रुपयांवर बंद झाला.
8 / 9
फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांच्या संपत्तीत सोमवारी गेल्या २४ तासांत १.२ अब्ज डॉलर्स किंवा ९,८७८ कोटी रुपयांची घट झाली आहे. मालमत्तेतील या घसरणीमुळे त्यांची एकूण संपत्ती ४३.१ अब्ज डॉलर्स झाली आहे. यानंतर ते अब्जाधीशांच्या यादीत घसरले आहेत.
9 / 9
फोर्ब्सनुसार, गौतम अदानी आता जगातील २७ व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. २०२२ मध्ये अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या दहा क्रमांकांमध्ये गौतम अदानी आणि रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना स्थान देण्यात आलं होतं. परंतु टॉप-१० मध्ये आता एकही भारतीय नाही.
टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीshare marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक