शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gautam Adani: अदानी समुहाला हादरा देणाऱ्या हिंडेनबर्गची कमाई कशी होते? करोडो रुपये कमावतात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2023 10:43 AM

1 / 9
गेल्या काही दिवसांपासून अदानी समुहाचे शेअर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत, त्यामुळे अदानी समुहाला हादरा बसला आहे.
2 / 9
यामुळे गेल्या काही दिवसापासून देशात हिंडेनबर्ग रिसर्चचे नाव चर्चेत आहे. हिंडेनबर्गने आपल्या एका अहवालाने अदानी समूहाला कोट्यवधी रुपयांचा दणका दिला आहे. अदानींना कोट्यवधी रुपयांचा झटका देऊन हिंडेनबर्गने बक्कळ कमाई केली आहे.
3 / 9
अदानी समूहावर हेराफेरी आणि फसवणूक केल्याचा आरोप करत हिंडेनबर्ग रिसर्च गेल्या आठवड्यापासून चर्चेत आहे. हिंडेनबर्ग यांनी अदानी समूहावर दोन वर्षे संशोधन केले आहे आणि त्यानंतर त्याचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात अदानी समूहाच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलाखती आणि हजारो दस्तऐवजांचा समावेश आहे. मात्र, या आरोपांनंतर गौतम अदानी यांनी आरोपांचे खंडन केले आहे.
4 / 9
हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत आहे. अदानींच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या घसरणीमुळे हिंडेनबर्गला मोठा नफा झाला आहे.
5 / 9
अदानी समूहाबाबत जारी केलेल्या अहवालात हिंडेनबर्गने अदानी समूहाच्या कंपन्यांवर शॉर्ट पोझिशन घेतल्याचे म्हटले आहे. हिंडेनबर्ग ही एक अमेरिकन कंपनी असून अमेरिकेतील अदानी समूहाच्या कंपन्यांच्या बाँड्समध्ये त्यांनी शॉर्ट पोझिशन्स घेतल्या आहेत.
6 / 9
Hindenburg स्वत:ला शॉर्ट सेलर म्हणते आणि शॉर्ट सेलिंगद्वारे कमाई करते हिंडेनबर्गनेही अदानी समूहावर शॉर्ट पोझिशन स्वीकारली आहे आणि त्यातून कमाई होत आहे. अदानी शेअर्समध्ये शॉर्ट पोझिशन घेतल्यानंतर हिंडेनबर्गने आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे.
7 / 9
शेअर मार्केटमध्ये दोन प्रकारे पैसे कमावता येतात. पहिला मार्ग म्हणजे जेव्हा एखादा शेअर आधी विकत घेतला जातो आणि जेव्हा त्याची किंमत वाढते तेव्हा तो वाढीव किंमतीला विकला जातो तेव्हा नफा होतो.
8 / 9
याला लाँग पोझिशन म्हणतात. दुसरीकडे, दुसरा मार्ग आहे जेव्हा एखादा शेअर ब्रोकरकडून उधार घेऊन बाजारात विकला जातो आणि जेव्हा त्या शेअरची किंमत कमी होते, तेव्हा तो पडलेल्या किंमतीला विकत घेतला जातो. अशा स्थितीत मध्यभागी मार्जिनमधून नफा मिळतो. याला शॉर्ट सेलिंग किंवा शॉर्ट पोझिशन म्हणतात.
9 / 9
शॉर्ट सेलिंग अंतर्गत, एखाद्या कंपनीच्या शेअर्सच्या किमती कमी होणे अपेक्षित आहे. या अंतर्गत, शेअर्स आधीच जास्त किमतीला विकले जातात आणि जेव्हा शेअर घसरू लागतात तेव्हा आधी विकलेले शेअर्स कमी किमतीत विकत घेतले जातात आणि नफा कमावला जातो.
टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीbusinessव्यवसाय