शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gautam Adani : दोन लाख कोटींचं कर्ज कसं फेडणार? पाहा काय म्हणाले गौतम अदानी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 3:41 PM

1 / 7
अदानी समूहाचे (Adani Group) अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत अलिकडच्या वर्षांत रॉकेट वेगाने वाढ झाली आहे. दरम्यान, अनेकदा अदानी समूहावरील कर्जावरून गौतम अदानी यांच्यावर टीका केली जाते. समूहावर असलेल्या कर्जाबाबत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी माहिती दिली आहे.
2 / 7
समूहावर २ लाख कोटी रुपयांच्या प्रचंड कर्जाबाबत विचारले असता अदानी यांनी आकडेवारीसह उत्तर दिले. जाणून घेऊया नक्की ते काय म्हणाले. समीक्षकांना अदानी समूहावर असलेल्या कर्जाची चिंता आहे. हे कर्ज मोठं आहे जवळपास दोन लाख कोटी? याचा तुम्ही भरवसा कसा द्याल हे तुम्ही फेडू शकता? असा सवाल त्यांना करण्यात आला. मी या गोष्टींनी हैराण आहे, कारण आम्ही आर्थिक स्थितीवर अधिक मजबूत आणि सुरक्षित आहोत, असं अदानी म्हणाले. इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं.
3 / 7
बोलताना त्यांनी टीकाकारांवर निशाणा साधला. “अशाप्रकारची आरडाओरड दोन प्रकारचे लोक करतात. पहिले ज्यांना आमच्या आर्थिक स्थितीबद्दल माहिती नाही. जर त्यांनी समजून घेतलं तर त्यांचं गैरसमज दूर होती. दुसऱ्या प्रकारचे स्वार्थी लोक आहेत, जे मुद्दाम गोंधळाची स्थिती निर्माण करत आहेत आणि आमची प्रतिष्ठा खराब करत आहेत,” असं त्यांनी सांगितलं.
4 / 7
“गेल्या ९ वर्षांत आमचा नफा, आमच्या कर्जाच्या दुपटीनं वाढला आहे. यामुळे आमचा डेट टू एबिटडा रेशो ७.६ वरून कमी होऊन ३.२ वर आला आहे. ही ती आकडेवारी आहे ज्यावरून आमच्या समूहाची खरी आर्थिक स्थिती समजून येते. आमच्या बहुतांश कंपन्या इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायाशी निगडीत आहे. त्या ठिकाणी पक्का कॅश फ्लो असतो, प्रोडक्शन प्रमाणे नाही. यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रेटिंग कंपन्यांनी आम्हाला भारताच्या सॉवरेन रेटिंगबरोबर ठेवलंय,” असं अदानी म्हणाले.
5 / 7
“लोक कोणतीही पुष्टी न करता चिंता व्यक्त करतात. ९ वर्षांपूर्वी आमच्या कर्जातील ८६ टक्के हिस्सा भारतीय बँकांमधून होता. आता तो केवळ ३२ टक्क्यांवर आला आहे. आमच्या कर्जाच्या ५० टक्के कर्ज हे आंतरराष्ट्रीय बाँड्समधून आहे. तुम्ही समजू शकता आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार संपूर्ण तपासानंतरच गुंतवणूक करतात,” असं त्यांनी देशातील खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकामधून घेतलेल्या कर्जावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
6 / 7
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी (Prime Minister Narendra Modi) असलेल्या त्यांच्या निकटतेमुळे त्यांना व्यवसायात मोठा फायदा झाल्याचा टीकाकारांचा आरोप आहे. मात्र अदानी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्या या यशामागे अनेक नेते आणि सरकारे असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला यश कोणत्याही एका नेत्यामुळे मिळालेले नाही, पण याचे श्रेय गेल्या तीन दशकांत झालेल्या धोरणात्मक बदलांना जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ते एकाच राज्यातून आले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर निराधार आरोप करणे सोपे जाते, असेही अदानी म्हणाले.
7 / 7
त्या टीकाकारांबद्दल तुमचे म्हणणे काय आहे, जे तुमचे यश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आहे असे म्हणतात, असा सवाल त्यांना करण्यात आला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी एकाच राज्यातून आलो, त्यामुळे माझ्यावर असे निराधार आरोप करणे सोपे जाते. मात्र यात तथ्य नाही. राजीव गांधी देशाचे पंतप्रधान असताना माझा प्रवास सुरू झाला. त्यांनी एक्झिम पॉलिसीला चालना दिली आणि त्यातूनच माझे एक्स्पोर्ट हाऊस सुरू झाले. ते नसते तर मी सुरुवात केली नसती,” असे अदानी या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीNarendra Modiनरेंद्र मोदी