Gautam Adani kidnapped in 1997; survived a terrorist attack of 2008 mumbai taj hotel
गौतम अदानींचेही झालेले अपहरण; दोनदा जिवावर बेतलेले, दहशतवादी हल्ल्यातून वाचले By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 10:47 AM1 / 8अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अग्निपथ योजना याला कारण ठरली आहे. उद्योजक आनंद महिंद्रा यांनी अग्निवीरांना नोकरी देण्याची घोषणा केली होती. यावर एका माजी जवानाने मला नोकरी मिळेल का? असा सवाल त्यांना केला होता. मी अदानींचे प्राण वाचविले होते, परंतू गेली १५ वर्षे मी बेरोजगार आहे, असेही या जवानाने म्हटले होते. 2 / 8अनेकांना अदानी हे अब्जाधीश आहेत, काही दिवसांपूर्वी ते बारामतीला देखील आले होते, आदी गोष्टी माहिती आहेत. परंतू, अदानींचे प्राण वाचविले तेव्हा नेमके काय झालेले, हल्ला झालेला की अपहरण झालेले या गोष्टी माहिती नाहीत. 3 / 8अदानी आज ६० वर्षांचे झाले. अदानी साधेपणाने आपला वाढदिवस साजरा करतात. तसेच मोठ्या तामझामपासून दूर असतात. गेल्या दोन दशकांत अदानींनी आपला उद्योग जगभरात पोहोचविला आहे. अदानी राजकारणापासूनही दूर असतात. 4 / 8राजकारणात सर्वच पक्षांत माझे मित्र आहेत, परंतू त्यांच्याशी मी कधीही राजकीय चर्चा करत नाही. आम्ही केवळ विकासाशी संबंधीत गोष्टींवर चर्चा करतो, असे अदानी म्हणाले होते. 5 / 8अशा या गौतम अदानींच्या दोनवेळा जिवावर बेतले होते. नव्वदीच्या दशकात अदानींचे अपहरण झाले होते. पैशांसाठी त्यांचे अपहरण करण्यात आल्याचे सांगितले जाते. यामुळे त्यांची सुरक्षा आता खूप कडक करण्यात आली आहे. १९९७ मध्ये या घटनेने सर्व यंत्रणा हादरल्या होत्या. 6 / 8एका स्थानिक गुंडांच्या टोळीने त्यांचे अपहरण केले होते, नंतर त्यांची सुटका करण्यात आली. ही सुटका कशी झाली, अपहरण कशासाठी केले गेले याची अधिक माहिती उपलब्ध नाहीय. 7 / 8आणखी एका घटनेत म्हणजे २६ नोव्हेंबर २००८ मध्ये ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हा अदानी तिथे जेवणासाठी गेले होते. ताज ह़ॉटेलमधून बाहेर काढण्यात आलेल्या शेवटच्या लोकांमध्ये अदानी देखील होते. 8 / 8अदानी यांनी पैशांच्या चढ-उतारावरून म्हटले आहे की, मी पैसे येतात, जातात हे पाहिले आहे. जेव्हा पैसा येतो तेव्हा जादा खूश व्हायची गरज नाही किंवा गेला म्हणून वाईटही वाटून घेऊ नये. आपल्या हातात जे नाही त्याची चिंता करत राहू नये. नियती सारे ठरवेल. आणखी वाचा Subscribe to Notifications