शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gautam Adani Group : गौतम अदानींना आणखी एक झटका! अदानी शेअर्स डाऊ जोन्सच्या बाहेर होणार, इंडेक्सने घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 11:21 AM

1 / 12
अमेरिकेतली हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यामुळे आता अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठा गोंधळ सुरू झाला आहे, अदानी समूहाच्या अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि अंबुजा सिमेंट या तीन समभागांचा ASM च्या यादीत समावेश झाल्यानंतर अदानी समूहाला अमेरिकन बाजारातूनही मोठा धक्का बसला आहे. आता डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्सने अदानी समुहाच्या शेअरांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
2 / 12
' 7 फेब्रुवारी 2023 पासून कंपनीचे शेअर्स डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून काढून टाकले जातील, असं डाऊ जोन्सने म्हटले आहे.
3 / 12
निर्देशांकाच्या वतीने घोषणा करताना अदानी समूहाच्या समभागात गोंधळ झाल्याच्या बातमीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. कंपनीचे शेअर्स 7 फेब्रुवारी 2023 पासून म्हणजेच पुढील मंगळवारपासून निर्देशांकातून वगळले जाणार असल्याचे यात म्हटले आहे.
4 / 12
हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यानंतर डाऊ जोन्सने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अदानी समूहाने आपला एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या घडामोडींमुळे अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स जे रु.3442 प्रति समभागाने व्यवहार करत होते ते आता 1565 रुपयांवर आले आहेत. कंपनीचे शेअर्स 55 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत.
5 / 12
दररोज अदानींच्या संपत्तीत मोठी घट होताना दिसत आहे. ताज्या आकडेवारीनुसार गौतम अदानी आता जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत टॉप-२० मधूनही बाहेर फेकले गेले आहेत.
6 / 12
Bloomberg Billionaires Index च्या माहितीनुसार गौतम अदानींच्या नेटवर्थमध्ये झालेल्या पडझडीमुळे ते आता श्रीमंतांच्या यादीत थेट २१ व्या स्थानावर पोहोचले आहेत. त्यांची एकूण संपत्ती आता ६१.३ अब्ज डॉलर इतकी झाली आहे आणि गेल्या २४ तासात त्यांना १०.७ अब्ज डॉलरचं प्रचंड नुकसान झालं आहे.
7 / 12
शेअर्समधील घट पाहता गौतम अदानी आता फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गपेक्षाही मागे गेले आहेत. झुकरबर्गची एकूण संपत्ती ६९.८ अब्ज डॉलर इतकी आहे आणि तो श्रीमंतांच्या यादीत १२ व्या स्थानावर आहे.
8 / 12
गौतम अदानी गुरुवारी ६४.७ अब्ज डॉलरसह जगातील श्रीमंतांच्या यादीत १६ व्या स्थानावर होते. अवघ्या २४ तासांत ते थेट पाच स्थानांनी खाली घसरुन २१ व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. २०२२ या वर्षात सर्वाधिक कमाई करणारे म्हणून ओळख मिळवलेल्या गौतम अदानींसाठी २०२३ हे वर्ष मात्र निराशाजनक ठरताना दिसत आहे.
9 / 12
ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार या वर्षाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत अदानींची एकूण ५९.२ अब्ज डॉलरची संपत्ती राख झाली आहे. गेल्या दहाच दिवसात अदानींना ५२ अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे.
10 / 12
गेल्या आठवड्याभरात अदानींच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे शेअर बाजारात लिस्टेट असलेल्या अदानींच्या कंपन्यांचा एकूण मार्केट कॅप १०० अब्ज डॉलरपेक्षाही कमी झालं आहे.
11 / 12
गुरुवारी शेअर बाजाराचा व्यवहार बंद होतना अदानी एंटरप्राइजेस लिमिटेडच्या शेअरमध्ये २१.६१ टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली असून शेअर १,६९४.१० रुपये इतका झाला आहे. अदानी पावरच्या शेअरमध्ये ४.९८ टक्के, तर अदानी विल्मर लिमिटेडच्या शेअर्समध्ये ५ टक्के घट नोंदवण्यात आली.
12 / 12
यासोबतच अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांनी घसरण झाली असून शेअर किंमत १,०३९ रुपये इतकी झाली आहे. अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांची घट झाली आहे.
टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीbusinessव्यवसायshare marketशेअर बाजार