gautam Adani latest News adani group said we have cash reserves in bid focus on growth
Gautam Adani:'परतावा देण्याचा समूहाचा २५ वर्षांचा इतिहास'; गौतम अदानींनी गुंतवणूकदारांना दिला विश्वास By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 9:57 AM1 / 11अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले. या आरोपानंतर अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. यामुळे उद्योगपती गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले. या आरोपानंतर आता अदानी समुहाने गुंतवणूकदारांना विश्वास दिला आहे. 2 / 11अदानी एंटरप्रायझेसचे तिमाहीचे आकडे समोर आल्यानंतर गौतम अदानी यांनी मंगळवारी गुंतवणूकदारांना विश्वास दिला. अदानी शेअरमध्ये सुरू असलेली घसरण तात्पुरती असल्याचे सांगितले. कंपनीची मूलभूत तत्त्वे मजबूत आहेत आणि आम्ही वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे.3 / 11'आमच्याकडे पैशांची कमतरता नसल्याचे अदानी समूहाने गुंतवणूकदारांना सांगितले आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी आमच्याकडे पुरेसा निधी आहे. आम्ही प्रगती करण्यावर भर देत आहे, असंही यात म्हटले आहे. 4 / 11'आमचा ताळेबंद खूप चांगल्या स्थितीत आहे आणि व्यवसाय वाढीचा वेग कायम ठेवण्याचे लक्ष आहे, असंही अदानी समूहाने म्हटले आहे.5 / 11अमेरिकन इन्व्हेस्टमेंट रिसर्च फर्म हिंडेनबर्गने अदानी समूहावर अन्यायकारकपणे शेअर्सच्या किमती वाढवल्याचा आरोप केल्यानंतर समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. 6 / 11अदानी समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी जुगशिंदर सिंग यांनी तिमाही अहवाल सादर केला. यावेळी त्यांनी गुंतवणूकदारांना विश्वास दिला.7 / 11'समूहाला त्यांच्या अंतर्गत नियंत्रणे, अनुपालन आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सवर विश्वास आहे. समूहाने त्यांच्याकडे पुरेशी रोख रक्कम आहे आणि त्यांची कर्जे पूर्ण फेडण्याची क्षमता आहे हे दर्शविण्यासाठी त्यांच्या कंपन्यांच्या आर्थिक विवरणांचे सारांश देखील स्वतंत्रपणे जारी केले आहेत. 8 / 11'आमच्याकडे उद्योगातील आघाडीची वाढ क्षमता, मजबूत कॉर्पोरेट ऑपरेशन्स, सुरक्षित मालमत्ता आणि मजबूत रोख प्रवाह आहे. सध्याचे बाजार स्थिर झाल्यावर आम्ही आमच्या भांडवली बाजार धोरणाचे पुनरावलोकन करू, पण भागधारकांना मजबूत परतावा देणारा व्यवसाय वितरीत करण्याच्या आमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, असंही अदानी समुहाने म्हटले आहे.9 / 1124 जानेवारीला हिंडेनबर्ग रिसर्च अहवाल समोर आल्यापासून अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. या आरोपाचा परिणाम गुंतवणूकदारांवर झाला. तीन आठवड्यांत समूह कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य 125 डॉलर अब्जांनी घसरले आहे. 10 / 11'बाजाराच्या या अस्थिर वातावरणात आमच्या व्यवसायाची गती सुरू ठेवण्यावर आमचे लक्ष आहे. आम्हाला आमच्या अंतर्गत नियंत्रणे, नियामक अनुपालन आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सवर विश्वास आहे, असंही सिंग म्हणाले. 11 / 11अदानी समूहावर सप्टेंबर 2022 तिमाहीच्या अखेरीस एकूण 2.26 लाख कोटी रुपयांचे कर्ज होते, तर त्यांच्याकडे 31,646 कोटी रुपयांची रोकड होती. सीएफओ म्हणाले की, समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा भागधारकांसाठी मूल्य निर्माण करण्यासाठी 25 वर्षांचा शिस्तबद्धचा इतिहास आहे आणि या कालावधीत समूह कंपन्या अनेक क्षेत्रांमध्ये अग्रणी म्हणून उदयास आल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications