शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी धक्का! शेअर्समध्ये मोठी घसरण, 6 कंपन्यांना लोअर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 1:26 PM

1 / 9
अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपामुले अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. या रिपोर्टमुळे उद्योगपती गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले, अजुनही अदानी समुहाच्या शेअरमध्ये घसरण सुरुच आहे.
2 / 9
आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट कंपन्यांच्या 10 समभागांपैकी 6 समभागांमध्ये लोअर सर्किट आहे. ज्या चार समभागांमध्ये सर्किट नाही ते देखील घसरणीसह व्यवहार करत आहेत.
3 / 9
अदानी एंटरप्रायझेसचा स्टॉक 8 टक्क्यांनी घसरला आहे आणि तो 1702 रुपयांवर व्यवहार करत आहे. अदानी ग्रीन 5% घसरून 688 रुपयांवर, अदानी विल्मर 5% घसरून 414 रुपयांवर आहे.
4 / 9
अदानी ट्रान्समिशन 5% घसरून 1127 रुपयांवर, अदानी पॉवर 5% खाली 156 रुपयांवर तर अदानी टोटल गॅस 5% खाली 1192 रुपयांवर व्यवहार करत आहे.
5 / 9
अदानी पोर्ट्स 7% खाली % घसरत 543 रुपये, ACC 4.20 टक्क्यांनी घसरून 1801 रुपये, अंबुजा सिमेंट 6.35 टक्क्यांनी घसरून 338 रुपये आणि NDTV 5 टक्क्यांनी घसरून 198 रुपयांवर व्यवहार करत आहे.
6 / 9
गेल्या महिन्यात २४ जानेवारी रोजी जाहीर झालेल्या हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रूपच्या शेअर्समध्ये भूकंप आला होता. त्यामुळे कंपनीला दररोज कोट्यवधींचं नुकसान सहन करावं लागत आहे. आतापर्यंत कंपनीच्या एकूण मार्केट कॅपमध्ये ११७ अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे.
7 / 9
शेअर्स पडल्यानं गौतम अदानींच्या नेटवर्थमध्येही मोठी घट झाली आणि अदानी श्रीमंतांच्या यादीतून थेट टॉप-२० बाहेर फेकले गेले आहेत. ब्लूमबगच्या रिपोर्टनुसार अदानी ग्रूपनं पुढील आर्थिक वर्षासाठी आपलं रेवेन्यू टार्गेट पूर्वलक्ष्यीत अंदाजाच्या तुलनेत ४० टक्क्यांनी कमी केलं असून थेट १५ ते २० टक्क्यांवर आणलं आहे.
8 / 9
हिंडनबर्गच्या वादळानंतर अदानी ग्रूपनं मोठं प्लानिंग केलं आहे. यात कर्जाची परतफेड, रोख बचत, कॅपिटल एक्स्पेंडिचर प्लानमध्ये घट आणि तारण ठेवलेल्या शेअर्सची सुटका करणे अशा मार्गांचा अवलंब केला जात आहे.
9 / 9
रिपोर्टनुसार अदानी ग्रूपच्या तीन कंपन्यांनी बँकांकडे आपले अतिरिक्त शेअर्स तारण ठेवले आहेत. ते सोडवण्याचा प्लान कंपनीनं तयार केला आहे. तारण ठेवलेल्या शेअर्समध्ये अदानी पोर्ट, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांचा समावेश आहे.
टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीshare marketशेअर बाजारbusinessव्यवसाय